सिंधुदुर्ग : भाजप माजी खासदार किरीट सोमय्यांनी महाविकास आघाडीतील परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. या पार्श्वभूमीवर आज किरीट सोमय्या आणि आमदार नितेश राणे यांनी पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यावर चर्चा केली. त्यानंतर सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील विविध घोटाळ्यांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा अनिल परब यांच्या रिसॉर्टवरून ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला.
“राऊत, बेळगाव जिंकू! हा दावा करत असतील तर…”, चंद्रकांत पाटलांनी उडवली खिल्ली
“परब यांचे दापोलीत दोन अनिधिकृत रिसॉर्ट आहेत. त्यावर कारवाई आणि परब यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, परब मंत्री असल्याने त्यांच्यावर कारवाई केली जात नसल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. तसेच, “आज ना उद्या परब यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी होणारच आहे आणि त्यांच्यावर फौजदारी आणि दिवाणी गुन्हे दाखल केल्याशिवाय भाजप स्वस्थ बसणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला आहे
बेळगाव महापालिकेवर शिवरायांचा भगवाच फडकेल, मराठी माणसाचीच सत्ता येणार – संजय राऊत
तसेच, “परब यांच्या दोन्ही रिसॉर्टमध्ये सीआरझेडच्या नियमांचा भंग झाला आहे. माझ्याकडे महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंटचे अधिकृत परिपत्रक आहे. पर्यावरण मंत्रालयाने, रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांना या रिसॉर्टवर कायदेशीर कारवाई करण्याचा आदेश दिला आहे. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंच्या कृपेने कारवाई होत नसून, त्यांना मंत्रिपदावर कायम ठेवले आहे. पण त्यांच्याविरोधात फौजदारी व सिव्हील कारवाई भाजप करणार!” असे त्यांनी सांगितले.
मंदिरे उघडा! मनसे-भाजप आक्रमक, अजित पवारांनी सांगितले मंदिरे कधी उघडणार…
“संचयनी ग्रुपकडून अनेक गुंतवणूकदारांची फसवणूक झाली आहे. यासंदर्भात आम्ही केंद्रीय मंत्र्यांची, जिल्हाधिकारी व एसपींची भेट घेतली असून, १५ वर्षापासून पैसे मिळावेत म्हणून प्रयत्न करत असलेले गुंतवणूकदारही मला भेटले. आम्ही पुढील १०० दिवसात हा विषय मार्गी लावणार आहोत. यासाठी पैसे परत मिळावेत म्हणून, संपत्ती लिलाव करण्यासाठी आम्ही पाठपुरावा करू आणि गरज पडली तर मोदी सरकार आणि आरबीआयची मदत घेऊ,” असंही ते म्हणाले.
Read Also :
- भाजपाचे कार्यकर्ते नुसते थुंकले तरी हे सरकार वाहून जाईल
- “नमस्कार ताई, तुम्हाला शब्द देतो…”, मुख्यमंत्र्यांनी दिले कल्पिता पिंपळेना आश्वासन
- राष्ट्रवादीचे एक पाऊल पारदर्शक कारभाराकडे; ‘सीसीटीव्ही’तून तपासणार स्वत: च्या नगरसेवकांचा खोटारडेपणा
- भाजपचा झोलझाल, चंद्रकांत पाटलांनी लिलाव करून पदे वाटली – राष्ट्रवादी
- नियम पाळा, पुन्हा सगळं बंद करण्यास भाग पाडू नका – अजितदादांनी खडसावलं