पुणे : पुण्यातील लोणी काळभोर पोलिस स्टेशनच्या हद्दीतून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने एका महिला सरपंचाला मारहाण झाल्याची लाजिरवाणी आणि संतापजनक घटना समोर आली आहे. त्या संबंधीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
मंदिरे उघडा! मनसे-भाजप आक्रमक, अजित पवारांनी सांगितले मंदिरे कधी उघडणार…
पुण्याच्या ग्रामीण भागात प्रचंड भयानक घटना समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याने महिला सरपंचाला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संबंधित घटना ही पुण्यातील लोणी काळभोर परिसरातील कदमवाकवस्ती भागात लसीकरण केंद्रात शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास घडली आहे. संबंधित घटनेचा थरार कॅमेऱ्यातही कैद झाला आहे. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे. या प्रकरणाची सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नाही. मारहाण झालेल्या महिला सरपंचाचं नाव गौरी गायकवाड असं आहे. तर मारहाण करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याचं नाव सुजित काळभोर असं आहे. मारहाण करणाऱ्याला आणि महिलेच्या पतीसह मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे सांगण्यात आले आहे.
बेळगाव महापालिकेवर शिवरायांचा भगवाच फडकेल, मराठी माणसाचीच सत्ता येणार – संजय राऊत
याप्रकरणी महिला सरपंच गौरी गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याने आपल्याला कानशिलात लगावली, असा आरोप महिला सरपंचाने पोलीस तक्रारीत केला आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मारहाणीचा प्रकार कॅमेऱ्यात अचूकपणे कैद झाला आहे. त्यात तो महिलेला मारहाण करताना स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार या कार्यकर्त्यावर नेमकी काय कारवाई करतात? याकडे सर्वांचं लक्ष आहे. तसेच पोलीसही नेमकी काय कारवाई करतात? हे आगामी काळात लक्षात येईल.
Read Also :
- “सेनेसोबत युतीचा विचारही नाही! पण भविष्यात काहीही होऊ शकते; पाटलांचे सूचक विधान
- मोठी बातमी! आमदार संग्राम जगतापांवर गंभीर आरोप, काँग्रेस नेत्यावरही विनयभंगाचा गुन्हा
- “प्रत्येक मंदिरात एक ‘ठाकरे-पवार दानपेटी’ बसवली तर…”; भाजपाचा सवाल
- महापालिका रणधुमाळी २०२२: राज्यातील सर्व महापालिका लढवणार, आम आदमी पार्टीची घोषणा
- पिंपरीतील लाच प्रकरणात मी पुर्णत: निर्दोष; लवकरच ‘दुध का दुध अन् पाणी का पाणी होईल’ – नितिन लांडगे