पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील लाच प्रकरणात माझा काही एक दोष नाही. माझ्या विरोधात जे राजकारण झालं त्यात मी पूर्णतः निर्दोष असून, प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने यावर भाष्य करणं उचित होणार नाही. परंतु लवकरच सत्य समोर येईल. “दुध का दुध आणि पाणी का पाणी होईल”, असा विश्वास स्थायी समितीचे अध्यक्ष अॅड. नितीन लांडगे यांनी दाखविला आहे. लाचखोरीच्या गुन्ह्यात अटकेत असलेले अॅड. नितीन लांडगे यांच्या जामिनावरील न्यायालयाने आज (ता.३०) निर्णय दिला. लांडगे यांच्यासह महापालिकेच्या चार कर्मचाऱ्यांनाही जामीन मंजूर करण्यात आला. त्यानंतर पहिल्यांदाच त्यांनी या प्रकरणावर प्रतिक्रीया दिली.
मंदिरे उघडा! मनसे-भाजप आक्रमक, अजित पवारांनी सांगितले मंदिरे कधी उघडणार…
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील होर्डिंगची वर्क ऑर्डर मिळण्यासाठी १० लाखांची लाच मागितल्याप्रकरणी स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे यांनी अटक करण्यात आली होती. लांडगे यांच्यासह महापालिकेच्या चार कर्मचाऱ्यांना (दि. ३० जुलै) रोजी जामीन मंजूर करण्यात आला. यावेळी नितिन लांडेग म्हणाले, भारतीय संविधान भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिले असून त्यांच्या संविधाच पालन करणारा नागरिक आहे. त्यांच्या संविधानाचा मला आदर आहे. त्यामुळे, कोणतेही चुकीचे काम केले नाही. परंतू, माझ्या विरोधात नाहक राजकारण करण्यात आलं. परंतू, त्यात माझा काही एक दोष नसून मी पुर्णत: निर्दोष आहे.
बेळगाव महापालिकेवर शिवरायांचा भगवाच फडकेल, मराठी माणसाचीच सत्ता येणार – संजय राऊत
ते म्हणाले, या प्रकरणाचा लवकरच छडा लागेल. त्यावेळी “दुध का दुध आणि पाणी का पाणी” होईल. तत्पुर्वी, माझ्यावरील जे काही आरोप लावले गेले आणि जे काही राजकारण करण्यात आले. त्या आरोपांबद्दल पिंपरी चिंचवडमधील जनता आणि माझ्या आणि माझ्या कुटूंबाच्या खंबीरपणे पाठीशी उभी राहिली. खरे तर मी प्रामाणिकपणे केलेल्या कामाची ही पावती होती. त्याचबरोबर, शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्यासह शहरातील पदाधिकारी माझ्या खंबीरपणे पाठीशी उभे राहिले त्याचे मी श्रुण कधीच फेडू शकणार नाही. राहिला प्रश्न या आरोपांचा, त्याबद्दल खरे सत्य लवकरत जनतेसमोर येईल, असेही लांडगे यांनी सांगितले.
Read Also :
- “राऊत, बेळगाव जिंकू! हा दावा करत असतील तर…”, चंद्रकांत पाटलांनी उडवली खिल्ली
- भाजपाचे कार्यकर्ते नुसते थुंकले तरी हे सरकार वाहून जाईल
- “नमस्कार ताई, तुम्हाला शब्द देतो…”, मुख्यमंत्र्यांनी दिले कल्पिता पिंपळेना आश्वासन
- राष्ट्रवादीचे एक पाऊल पारदर्शक कारभाराकडे; ‘सीसीटीव्ही’तून तपासणार स्वत: च्या नगरसेवकांचा खोटारडेपणा
- भाजपचा झोलझाल, चंद्रकांत पाटलांनी लिलाव करून पदे वाटली – राष्ट्रवादी