मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष किरण काळे या दोन नेत्यांच्यात सध्या नगरच्या आयटी पार्कवरुन रंगलेला वाद वेगळे वळण घेत असून, काळे यांनी जगताप यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत, तर या प्रकरणाचा भांडाफोड केल्याने जगतापांनी आमच्यावर एका महिलेला पुढे करुन खोटा गुन्हा दाखल केल्याचा असल्याचे काळे यांनी म्हटले आहे. त्यामुळे, अहमदनगर आयटी पार्कवरुन राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध काँग्रेस असं चित्र निर्माण झालं आहे.
मंदिरे उघडा! मनसे-भाजप आक्रमक, अजित पवारांनी सांगितले मंदिरे कधी उघडणार…
काय आहे प्रकरण?
आयटी पार्कच्या नावाखाली तिथे कॉल सेंटर चालवलं जात असल्याचा आरोप करत काळेंनी, जगताप यांचा पितळ उघडं पाडण्यासाठी आणि त्यांनी मतदारांना दिलेली आश्वासने खोटी आहेत, हे दाखवण्यासाठी काळेंनी आयटी पार्क मध्ये जाऊन पाहणी केली आणि चित्रीकरण केलं. यावेळी त्यांनी इथल्या काही कर्मचाऱ्यांच्या मुलाखतीही घेतल्या आणि जगताप यांचा दावा खोटा असल्याचे त्यांनी प्रसार माध्यमांसमोर जाहीर केलं.
“राऊत, बेळगाव जिंकू! हा दावा करत असतील तर…”, चंद्रकांत पाटलांनी उडवली खिल्ली
मात्र, त्यांचा हा डाव त्यांच्यावरच उलटला. आयटी पार्कमध्ये पाहणीसाठी आल्यानंतर , काळेंनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी गैरवर्तन केल्याची तक्रार एका महिला कर्मचाऱ्याने दिली असून, त्यावरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात काळे आणि कार्यकर्त्यांवर विनयभंग तसेच, दमदाटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, नगरमध्ये आयटी पार्क निर्माण करून, तरुणांना रोजगार मिळवून दिला असल्याचा दावा स्थानिक आमदार संग्राम जगताप यांनी केला होता.
“अनिल परबांची विकेट काढल्याशिवाय भाजप स्वस्थ बसणारा नाही!” सोमैय्यांचा इशारा
दुसरीकडे, काळेंनी महिलेने दाखल केलेल्या तक्रारीनंतर सांगितले की, आम्ही त्याठिकाणी जबरदस्तीने प्रवेश केला नाही. आम्ही पोलिसांना हे फुटेज दाखवणार आहोत. मात्र, माता-भगिनींना, महिलांना पुढे करुन याप्रकारचे खोटे गुन्हे दाखल दाखल करण्याची आमदार संग्राम जगतापांना जुनीच सवय आहे.” त्यामुळे, स्थानिक पाताळावीवर महाविकास आघाडीत अनेक खटके उडत असल्याचे यातून पुन्हा एकदा दिसून आले आहे.
Read Also :
- “प्रत्येक मंदिरात एक ‘ठाकरे-पवार दानपेटी’ बसवली तर…”; भाजपाचा सवाल
- महापालिका रणधुमाळी २०२२: राज्यातील सर्व महापालिका लढवणार, आम आदमी पार्टीची घोषणा
- पिंपरीतील लाच प्रकरणात मी पुर्णत: निर्दोष; लवकरच ‘दुध का दुध अन् पाणी का पाणी होईल’ – नितिन लांडगे
- “देशमुखांना फरार घोषित करून, त्यांची संपत्ती जप्त करा!”, भाजपची आक्रमक मागणी
- “खंजीर खुपसणाऱ्या सेनेला धडा शिकवण्यासाठी हेच एक उत्तर!”, पाटलांनी सांगितला फॉर्म्युला