रत्नागिरी : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत हायकोर्टानंतर, सुप्रीम कोर्टाने देखील वाढ केल्यांनतर, त्यांच्या लीगल टीम मधल्या वकिलाला सीबीआयने ताब्यात घेतले आहे. तसेच, त्यांच्या जावयाची २० मिनिटे चौकशी करून सोडून दिल्यानंतर, दुसरीकडे वकील आनंद डाग यांना ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. मात्र, ईडीच्या ५ समन्स नंतरहि देशमुख समोर येण्यास तयार नाहीत. यावरून, “त्यांना फरार घोषित करुन संपत्ती जप्त करावी,” अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे.
“शिवसेनेला मराठवाडा-विदर्भात भाजपने वाढवलं”, चंद्रकांत पाटलांचं विधान
संचयनी ग्रुपकडून झालेल्या गुंतवणूकदारांच्या फसवणुकीबाबत सोमय्या आणि आमदार नितेश राणेंनी आज रत्नागिरी पोलीस अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. त्यानंतर सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील विविध घोटाळ्यांवर भाष्य केलं. “देशमुख प्रकरणाला वेगळं वळण लागलं असून, त्यांच्याकडून पुरावे नष्ट करण्याचे, साक्षीदार फोडण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे, त्यांना फरार घोषित करून, त्यांची संपत्ती जप्त करावी,” अशी मागणी करत, अनिल परब यांच्यांवरही टीका केली आहे.
“अनिल परबांची विकेट काढल्याशिवाय भाजप स्वस्थ बसणारा नाही!” सोमैय्यांचा इशारा
“परब यांचे दापोलीत दोन अनिधिकृत रिसॉर्ट आहेत. त्यावर कारवाई आणि परब यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, परब मंत्री असल्याने त्यांच्यावर कारवाई केली जात नसल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. तसेच, “आज ना उद्या परब यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी होणारच आहे आणि त्यांच्यावर फौजदारी आणि दिवाणी गुन्हे दाखल केल्याशिवाय भाजप स्वस्थ बसणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला आहे.
“खंजीर खुपसणाऱ्या सेनेला धडा शिकवण्यासाठी हेच एक उत्तर!”, पाटलांनी सांगितला फॉर्म्युला
दरम्यान, सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वी ठाकरे सरकारच्या घोटाळेबाज ११ नेत्यांची एक यादी जाहीर केली होती. यात १२ वा खेळाडू जितेंद्र आव्हाड आहेत, असं भाष्य त्यांनी केलं होतं. त्यात त्यांनी आज अजून भर टाकली असून, मुख्यमंत्री स्वत: घोटाळेबाज आहेत. त्यांनी १९ बंगले बांधले आहेत, त्यातले काही बायकोच्या नावावर आहेत. हे असे घोटाळे सुरूच राहिले तर यादीची लांबी अशीच वाढत जाईल,” असा घणाघात त्यांनी केला.
Read Also :
- “राऊत, बेळगाव जिंकू! हा दावा करत असतील तर…”, चंद्रकांत पाटलांनी उडवली खिल्ली
- बेळगाव महापालिकेवर शिवरायांचा भगवाच फडकेल, मराठी माणसाचीच सत्ता येणार – संजय राऊत
- मंदिरे उघडा! मनसे-भाजप आक्रमक, अजित पवारांनी सांगितले मंदिरे कधी उघडणार…
- “नमस्कार ताई, तुम्हाला शब्द देतो…”, मुख्यमंत्र्यांनी दिले कल्पिता पिंपळेना आश्वासन
- फास आणखी आवळला, देशमुखांचे वकिल आणि तिवारी यांना ७ दिवसांची पोलीस कोठडी