मुंबई : एका प्रसिद्ध कॅसेट कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक भूषण कुमार यांच्यावर एका महिलेने बलात्काराचे आरोप केल्याची बातमी गेले दोन महिने चर्चेत आहे. या प्रकरणात आता राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे नाव जोडले गेले आहे. त्याचे कारण पीडित महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी मदत करणाऱ्या एका सामाजिक कार्यकर्त्याला धमकी देतानाची ऑडिओ क्लिप वायरल झाली आहे.
राष्ट्रवादीचे एक पाऊल पारदर्शक कारभाराकडे; ‘सीसीटीव्ही’तून तपासणार स्वत: च्या नगरसेवकांचा खोटारडेपणा
सदर पीडित महिलेला घेऊन सामाजिक कार्यकर्ते मलिकार्जुन पुजारी आणि वकील एस. बालकृष्णन यांनी राज्यपालांची भेट घेतली. त्यानंतर ही क्लिप वायरल झाली आहे. कॅसेट कंपनीच्या संचालकावर एका महिलेने बलात्काराचे आरोप केले आहेत. मात्र, सदर पीडितेला मदत करणाऱ्या मलिकार्जुन या सामाजिक कार्यकर्त्याला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड धमकी देत असल्याची कथित ऑडिओ क्लिप वायरल झाली आहे. बलात्कार पीडितेने मलिकार्जुन यांच्या मदतीने राज्यपालांची देखील भेट घेतल्यामुळे आव्हाड संतापले असल्याचं या ऑडियो क्लिपमधून समोर येतं आहे. या प्रकरणातील एक वकील एस. बालकृष्णन यांनी ही ऑडियो क्लीप प्रसारित केली असून त्याच्या सत्यतेची आम्ही पुष्टी करीत नाही.
काय म्हणाले नेमकं आव्हाड?
जितेंद्र आव्हाड : तू कोणत्या तरी माणसाला एका पोरीवरून ब्लॅकमेल करत आहेस ?
मलिकार्जुन पुजारी : साहेब तुमच्यापर्यंत आलं का ?
जितेंद्र आव्हाड : माझ्यापर्यंत नाही ते प्रकरण शरद पवार साहेब आणि प्रफुल्ल पटेल यांच्या पर्यंत गेलंय…
मलिकार्जुन पुजारी : साहेब मी ब्लॅकमेल नाही करत, ती मुलगी आपल्याकडे न्याय मागायला आली होती.
जितेंद्र आव्हाड : अरे जाऊदे मरूदे तिला, कशाला करता नको ते उद्योग भे#$%… तो माणूस कोण आहे माहित आहे का तुला ?
मलिकार्जुन पुजारी : साहेब मला माहित आहे कोण आहे तो, मात्र ती मुलगी आपलं जीवन संपवायला गेली होती.
जितेंद्र आव्हाड : अरे जाऊदे मरूदे तिला, तु फुकट कशाला बदनाम होतो.
मलिकार्जुन पुजारी : मी कशाला बदमान होतो, मी तर त्याला काही बोललो नाही, उलट तोच मला बोलला की मुलीला समजवा गुन्हा दाखल करू देऊ नका, त्यानंतर मी त्याला सांगितलं की, मी काय समजवू बाबा, तुझं काय असेल तर तो भेटून गेलाय मला नवी मुंबईमध्ये, बोलला मी समजवतो त्या मुलीला….
जितेंद्र आव्हाड : तु काही मध्ये पडू नको…
THE BIGGEST EXCLUSIVE !!!!
MVA Minister @Awhadspeaks asking a person named Pujari to not help a girl who has accused T-Seriers Honcho Bhushan Kumar.
Let the Girl commit suicide Bhushan has asked help from @PawarSpeaks & @praful_patel.
Another Sushant Type Suicide/Murder ?? pic.twitter.com/urLxqXg1Du
— Sameet Thakkar (@thakkar_sameet) September 3, 2021
Read Also :
- चुकीचे वागणाऱ्यांची शहनिशा करणे आमचे कामच; नगरसेवकांवर दाखवलेल्या अविश्वासाला अजितदादांचा पाठींबा
- राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याकडून महिला सरपंचाला मारहाण; पुण्यातील धक्कादायक प्रकार
- राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याकडून महिला सरपंचाला मारहाण; पुण्यातील धक्कादायक प्रकार
- “सेनेसोबत युतीचा विचारही नाही! पण भविष्यात काहीही होऊ शकते; पाटलांचे सूचक विधान
- मोठी बातमी! आमदार संग्राम जगतापांवर गंभीर आरोप, काँग्रेस नेत्यावरही विनयभंगाचा गुन्हा