IMPIMP

सत्ताधारी पक्षच घाबरलेल्या अवस्थेत – गिरीश  महाजन 

मुंबई :  “आम्ही विरोधी पक्षाचे काम करीत आहोत, परंतु सत्ताधारी पक्षच घाबरलेल्या अवस्थेत असून भाजप सरकार पाडणार असल्याची आवई अधूनमधून तेच उठवित असतात. आम्हाला सरकार पाडण्याची काहीही गरज नाही, तिघांचे पायात पाय अडकून तेच पडणार आहेत”, असा टोला भाजपचे नेते व माजी मंत्री गिरीश महाजन यांनी लगावला आहे.शिवसेनेने आमचा घात करून ते सत्तेत जावून बसले आहेत. त्यांना आम्ही शुभेच्छाही दिल्या आहेत. 
 
राज्यात आज सरकार विरोधात तीव्र असंतोष आहे. शेतकरी, एस.टी.कामगार, शेतमजूर, तसेच सर्वसामान्य जनता नाराज आहे. आज राज्यात सरकार कसे चालले आहे. हे सर्वाना दिसून आले आहे. त्यामुळे आम्ही कोणताही सरकार पाडण्याचा कोणताही फार्मुला वापरण्याची गरज नाही, आणि आम्ही तसा विचारही करीत नाही. राज्यात तीन पक्षाचे हे सरकारआपल्याच पायात पाय अडकून पडणार आहे. याची जाणीव सरकारमध्ये असलेल्या तीनही पक्षांना आहे. त्यामुळे तेच सरकार पडणार नाही, पाच वर्षे चालणार, असे वारंवार सांगत असतात.सरकारमध्ये असलेल्या तीनही पक्षाच्या नेत्यामध्ये तसेच मंत्र्यामध्ये सरकार पडण्याची कायम भिती दिसून येत आहे,” असेही महाजन म्हणाले.