जळगाव : जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि भाजप नेते गिरीश महाजन पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. खरंतर दोन्ही नेते सध्या एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत. त्यामुळे त्यांच्यातील वादाची ही पहिली वेळ नाही. यावेळी वादामागील कारण थोडसं वेगळं आहे. गिरीश महाजन यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. तर दुसरीकडे खडसे यांनी मराठा विद्या प्रसारक संस्था वादाच्या प्रकरणावरुन पोलिसांकडून तपास सुरु असून महाजनांवर मोक्का लावण्याची प्रक्रिया सुरु असल्याच्या भीतीपोटी कोरोना झाला का? असा सवाल उपस्थित केला होता.
‘डान्सिंग डॉल’ची उपमा देणं पडलं महागात; अमृता फडणवीसांचा विद्या चव्हाणांवर अब्रुनुकसानीचा दावा
त्यांच्या या टीकेवर गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना ठाण्यात ट्रिटमेंटची गरज आहे, असं प्रत्युत्तर दिलं होतं. त्यानंतर आता एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा गिरीश महाजनांना उत्तर दिलं आहे. “गिरीश महाजन यांना पुण्याच्या बुधवार पेठेत पाठवावं लागेल”, अशी शब्दात एकनाथ खडसे यांनी टोला लगावला आहे.
महिलांबद्दल बोलताना सर्वांनीच काळजी घ्यावी; देवेंद्र फडणवीसांचा सर्वपक्षीय नेत्यांना मोलाचा सल्ला
“नाथाभाऊंना ठाण्याच्या रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता नाही. पण गिरीशभाऊंना पुण्याच्या बुधवार पेठेत पाठवलं पाहिजे. जळगावला जे मोक्कामध्ये आरोपी आहेत त्यांच्या घरावर आता पोलिसांची छापेमारीची कारवाई सुरु आहे. संबंधित प्रकरणाविषयी अधिर माहिती घेण्यासाठी हे छापे पडले असावेत”, असं एकनाथ खडसे म्हणाले.
गोवा आणि युपीमध्ये शिवसेना रणशिंग फुंकणार? संजय राऊतांनी निवडणुकीच गणित सांगितलं
जळगाव येथील मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या वादातून अॅडवोकेट विजय भास्कर पाटील यांनी माजी जलसंपदा मंत्री, आमदार गिरीश महाजन यांच्यासह भोईटे गटावर निंभोरा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. हा गुन्हा कोथरुड पोलीस स्टेशनला वर्ग करण्यात आला होता. या गुन्ह्यातील भोईटे गटाच्या नऊ जणांवर मकोका लावण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणी चौकशीसाठी पुणे कोथरूड पोलिसांचे पथक जळगावात धडकले असल्याची माहिती समोर आली असून माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पुणे पोलिसांचे पथक सध्या भोईटे कुटुंबीयांसह इतर ठिकाणी झाडाझडती घेत असून महत्त्वाचे धागेदोरे व दस्तावेज पोलिसांकडून हस्तगत केल्या जाण्याची शक्यता आहे. मात्र तूर्तास तरी पुणे पोलिसांकडून जळगाव पोलिसांकडून याबाबत प्रतिक्रिया देणे टाळले आहे.
Read also:
- …म्हणून महापौर किशोरी पेडणेकरांना कोरोना आवडतो; भाजप नेते किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप
- भाजप नेते गिरीष महाजन अडचणीत; पुणे पोलिसांची जळगावात छापेमारी
- शाळा बंद झाल्या, आता दारुची दुकानं बंद होणार? आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणतात…
- देशात कोरोनाचे थैमान, पंतप्रधान मोदींनी बोलावली तातडीची बैठक; काय निर्णय घेणार?
- कोरोनाचे दूत बनू नका, नव्या नियमावलीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची कळकळीची विनंती…