मुंबई : मी धनंजय मुंडेंचा कार्यकर्ता आहे, तु राजकारण सोडून दे. बीडमधून निघून जा, नाही तर तुला जाळून मारू, अशा धमकीचे फोन आपल्याला येत असल्याची तक्रार करूणा मुंडे यांनी पोलीस अधीकांकडे आज निवेदनाद्वारे केली आहे. या प्रकरणात बालाजी डोईफोडे या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणीही मुंडे यांनी केली आहे.
“घटनाबाह्य जितक्या कृती केल्या, त्याचे पापक्षालन राजीनाम्यामुळे होणार नाही”
मला गेल्या काही दिवसांपासून धमक्या दिल्या जात आहेत, पेट्रोल पंपावर जाळून मारून टाकू, असे फोन येत आहेत. हे कोणाच्या सांगण्यावरून केले जात आहे हे मला माहित आहे. पण मी घाबरणार नाही, २५ वर्ष प्रेमापोटी शांत राहिले, पण आता धमक्या दिल्या तर सगळा कच्चाचिठ्ठा बाहेर काढीन, असा इशारा त्यानंतर करूणा मुंडे यांनी दिला आहे.
“काॅंग्रेस अन् राष्ट्रवादीही सोबत येतील, त्यांच्याशी आमचं फक्त मुद्यांचे भांडण”; प्रकाश आंबेडकर
दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे हे करूणा मुंडे याप्रकरणात अडकले होते. करूणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. यादरम्यान अनेक राजकीय घटनाही घडल्या असून धनंजय मुंडे यांच्याकडून मला त्रास दिला जात असल्याचा आरोप करूणा मुंडे सातत्याने करीत आहेत. हे प्रकरण हिवाळी अधिवेशनात देखील गाजलं होतं. यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनंजय मुंडे यांची फिरकी घेतली होती.
Read also
- भारतीय जुमला पार्टीचे प्रत्येक पाप जनतेपर्यंत पोहचवा..! काँग्रेसच्या ‘हाथ से हाथ जोडो’ अभियानाला सुरूवात
- मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांची पुन्हा दिल्लीवारी…! मंत्रिमंडळाबाबत खलबत्त, बंडखोर आमदारांमध्ये नवचैतन्य
- “संजय राऊतांची आज पुन्हा कोर्टवारी….!” आज कोर्टात महत्वपुर्ण याचिकेवर सुनावणी
- “उद्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मिंधे गटात अथवा भाजपात गेलेत तर नवल नाही”; उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर निशाणा
- “कसबा पेठ मतदार संघ काॅंग्रेसकडे आणण्यासाठी मास्टर प्लॅन तयार”