मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या, पक्षातील लीडरशीप संपवली आहे. हुकुमशाहीविरोधात उभे राहणाऱ्या प्रादेशिक पक्षांना आमचा पाठिंबा असेल. राजकारण नितीमत्तेवर येईल असा आमचा प्रयत्न असेल. शिवसेना ही प्रबोधनकार ठाकरे यांच्या हिंदुत्त्वार चालत आहे. देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे सुरू आहे. या हुकूमशाहीच्या विरोधात उभे राहिले पाहिजे. त्यासाठी आम्ही एकत्र आहोत. अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. आज आंबेडकर भवन येथे भीमशक्ती आणि शिवशक्ती युतीची घोषणा झाली. त्यावेळी ते बोलत होते.
“बाळासाहेबांना शेवटचा नमस्कारही करू शकलो नाही”; केंद्रीय मंत्र्यांची व्यक्त केली खंत
पुढे बोलतांना ते म्हणाले की, आज वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना असे आम्ही दोघे एकत्र आहो आहोत. या निमित्ताने निवडणुकांमध्ये एक बदलाचं राजकारण सुरू झालं आहे. उपेक्षितांचे, मुद्यांचे राजकारण पुन्हा चालू होईल अशी आम्हाला खात्री आहे, काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस हे दोन्ही पक्ष सोबत येतील अशी अपेक्षा आहे. आमचं राष्ट्रवादी काॅंग्रेससोबत फक्त मुद्यांचे भांडण आहे. ते काही शेतातील भांडण नाही. तसेच सध्या देशबर इडीच्या माध्यमातून राजकीय नेतृत्व संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे. सत्तेचा अमरपट्टा कोणीही घेऊन आलेला नाही. प्रत्येकाला एक दिवस जायचं आहे. असंही त्यांनी सांगितले.
अखेर भीमशक्ती अन् शिवशक्ती युतीची घोषणा..! महाविकास आघाडीत चौथा भिडू..
महाराष्ट्रातील जनता ज्याची निर्णयाची वाट बघत होती, आणि पुढची वाटचाल एकत्र करण्यासाठी म्हणून या वास्तूमध्ये आलो आहेत. आंबेडकर आणि ठाकरे या नावाला इतिहास आहे. माझे आजोबा आणि प्रकाश आंबेडकरांचे आजोबा स्नेही होते. दोघांनीही समाजातील वाईट रूढी पंरपरा यांच्या विरोधात आवाज उठवला. याबद्दल आम्ही दोघांनी वेगळं सांगायची आवश्यकता नाही. सध्या राजकारणात ज्या वाईट रूढी पंरपरा सुरू तो त्या मो़डून टाकण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत, अशीही प्रतिक्रिया ठाकरेंनी दिलीय.
आज वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना असे आम्ही दोघे एकत्र आलो आहोत.या निमित्ताने निवडणुकांमध्ये एक बदलाचं राजकारण सुरू झालं आहे. उपेक्षितांचे,मुद्द्यांचे राजकारण पुन्हा चालू होईल अशी आम्हाला खात्री आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष सोबत येतील अशी अपेक्षा आहे.
१/४ pic.twitter.com/ovaDcmerV7
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) January 23, 2023
Read also
- “महाराष्ट्राच्या जनतेच्या नाकावर टिच्चून आम्ही त्यांना तिथेच ठेवणार अशी मोदींची भूमिका”
- मला राज्यपाल पदापासून मुक्त करा..! भगतसिंह कोश्यारी यांची नरेंद्र मोदींकडे मागणी
- …त्यामुळेच शिवशक्ती अन् भीमशिक्ती एकत्र आली..! उद्धव ठाकरेंनी सांगितलं कारण
- “कसबा पेठ पोटनिवडणुक बिनविरोध करण्याचा आमचा प्रयत्न”, भाजपकडून सुचक वक्तव्य
- “शिवशक्ती अन् भीमशक्ती युतीबाबत आमची भूमिका सकारात्मक”; काॅंग्रेसकडूनही हिरवा कंदील