मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अन् वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज युतीची घोषणा केली आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीमध्ये चौथा भिडू म्हणूून वंचित बहुजन आघाडी सहभाग होेण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी अन् काॅंग्रेसकडून या युतीबाबत अद्यापही कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीला सामावून घेण्याची कोणाचीही हरकत नसणार असं वक्तव्य शिवसेनेचे नेते आणि प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
“महाराष्ट्राच्या राजकारणातील नवे पर्व…! शिवशक्ती अन् भीमशक्ती युतीची घोषणा होणार?”
महाराष्ट्रातील जनता ज्याची निर्णयाची वाट बघत होती, आणि पुढची वाटचाल एकत्र करण्यासाठी म्हणून या वास्तूमध्ये आलो आहेत. आंबेडकर आणि ठाकरे या नावाला इतिहास आहे. माझे आजोबा आणि प्रकाश आंबेडकरांचे आजोबा स्नेही होते. दोघांनीही समाजातील वाईट रूढी पंरपरा यांच्या विरोधात आवाज उठवला. याबद्दल आम्ही दोघांनी वेगळं सांगायची आवश्यकता नाही. सध्या राजकारणात ज्या वाईट रूढी पंरपरा सुरू तो त्या मो़डून टाकण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत, अशीही प्रतिक्रिया ठाकरेंनी दिलीय.
चिंचवड पोटनिवडणुकीत आम आदमी पार्टीची उडी..! भाजप, राष्ट्रवादीला डोकेदुखी ठरणार ?
गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. आंबेडकर आणि ठाकरे यांच्यात दोन बैठकाही झाल्या. देशात एक वातावरण आहे. त्यानुसार देश हुकुमशाहीकडे चालला आहे. जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात आहे. नको त्या गोष्टीकडे लक्ष जात आहे. त्यामुळे देश भरकटवण्याचं काम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर देशाचा भवितव्याचा विचार करून दोन्ही नेत्यांनी एकत्र यायचं ठरवलं. संभाव्य संकट रोखण्यासाठी या दोन्ही शक्तींनी शक्तींनी युती करण्याचा निर्णय घेतला जात आहे. असं सुभाष देसाई यांनी म्हटलं आहे.
पंकजा मुंडेंना भाजच्याच नेत्यांकडून बदनाम करण्याचा कट, बावनकुळेंचं मोठं वक्तव्य
दरम्यान, हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जंयती असून विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. आज सांयकाळी ष्णंमुखानंद सभागृहात उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी ते नेमके काय बोलणार त्याकडे सगळ्यांचं लक्ष्य आहे.
Read also
- “बाळासाहेबांचं स्वप्न होतं, अजून बरचं काही घडणार”, शिवसेनेकडून सुचक वक्तव्य
- “पोटनिवडणुकांसाठी भाजपची रणनीती ठरली, चंद्रकांत पाटलांची मोठी घोषणा”
- “पंतप्रधान पदासाठी संजय राऊत अन् राहुल गांधी यांनी 2047 ची वाट पहावी”
- कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी भाजप अॅक्शन मोडवर..! आज भाजपकडून उमेदवार घोषीत होण्याची शक्यता
- “सुषमा अंधारे ही काळी मांजर…!” गजानन काळेंची सुषमा अंधारेंवर जहरी टिका