मुंबई : राज्यात आजपासून राजकारणाचा एक नवा अध्याय सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जंयती देखील साजरी केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर आज उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडणार आहे. या पत्रकार परिषदेत आज शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येण्याची शक्यता राजकारणाच्या वर्तुळात वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
चिंचवड पोटनिवडणुकीत आम आदमी पार्टीची उडी..! भाजप, राष्ट्रवादीला डोकेदुखी ठरणार ?
महाराष्ट्राच्या राजकारणासाठी हे क्रांतीकारक पाऊल आहे. बाबासाहेबांचे नातू आणि प्रबोधनकार ठाकरे यांचे नातू येणार आहेत. ही तर सुरूवात आहे. आता महाराष्ट्रात अजून बरचं काही घडणार आहे. ही दोन पक्षाची युती नाही. तर शिवशक्ती-भीमशक्तीची युती आहे. ही विचारांची युती आहे. दोघांची ताकद महाराष्ट्राबाहेरही आहे. बाळासाहेब ठाकरे यांचं हे स्वप्न होतं. दोन्ही विचारधारा एकत्र याव्यात. दोन शक्ती एकत्र याव्यात असंही राऊतांनी म्हटलं आहे.
पंकजा मुंडेंना भाजच्याच नेत्यांकडून बदनाम करण्याचा कट, बावनकुळेंचं मोठं वक्तव्य
कुणाला वाटत असेल आमच्यामागे महाशक्ती आहे, आम्हाला महाशक्तीचा पाठिंबा आहे, पण त्यात तथ्य नाही. ठाकरे-आंबेडकर एकत्र येईल ती खरी महाशक्ती असेल. त्या महाशक्तीसमोर कुणाचा टिकाव लागणार नाही. या महाशक्तीमुळे आघाडी अधिकच मजबुत होईल असंही राऊतांनी म्हटलं आहे.
गजानन काळेंचं आजपासून नाव गांजा काळे…! अभिजित बिचूकले अन् गजानन काळेंची जुंपली
दरम्यान, आज शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी यांची दादर येथील आंबेडकर भवन याठिकाणी पत्रकार परिषद होत आहे. दुपारी 1 वाजता ही पत्रकार परिषद होत असून यावेळी शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. तसेच शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या युतीची घोषणा होणार असल्याचं संकेत या पत्रकार परिषदेतून देण्यात आले आहेत.
Read also
- “पोटनिवडणुकांसाठी भाजपची रणनीती ठरली, चंद्रकांत पाटलांची मोठी घोषणा”
- “पंतप्रधान पदासाठी संजय राऊत अन् राहुल गांधी यांनी 2047 ची वाट पहावी”
- कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी भाजप अॅक्शन मोडवर..! आज भाजपकडून उमेदवार घोषीत होण्याची शक्यता
- “सुषमा अंधारे ही काळी मांजर…!” गजानन काळेंची सुषमा अंधारेंवर जहरी टिका
- “महाराष्ट्राच्या राजकारणातील नवे पर्व…! शिवशक्ती अन् भीमशक्ती युतीची घोषणा होणार?”