कोल्हापूर : कोल्हापूर उत्तरेत आता प्रचार यंत्रणा थांबल्या आहेत. काल कोल्हापूर उत्तरेत प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने महाविकास आघाडी, भाजपच्या दिग्ग्ज नेत्यांनी उपस्थिती दर्शविली होती. भाजपकडून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तर महाविकास आघाडीकडून पालकमंत्री बंटी पाटील यांची सभा घेतली. या निवडणुक मतदानासाठी दोन दिवस शिल्लक भाजपच्या माजी नगरसेविकेच्या कार्यालयात पैशाची पाकिटं सापडल्यानं खळबळ उडाली आहे.
राज ठाकरे बाळासाहेबांचे पुतणे, वारसदार नाहीत; रामदास आठवलेंचं वक्तव्य
भाजपकडून सत्यजित कदम तर महाविकास आघाडीकडून जयश्री जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यासाठी उद्या मतदान होत आहे. त्याआधीच भाजपच्या माजी नगरसेवकाच्या घरी पैशाची पाकिटं सापडली आहे. त्यामुळे याप्रकरणी पोलिसांनी भाजपच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. लोकांना पैसे वाटप करत असल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलं आहे. अशी माहिती मिळत आहे.
“सोमय्या पळणारा नेता नाही, पळवणारा नेता आहे”; प्रवीण दरेकांचा आघाडीवर निशाणा
या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. मात्र कोणावरही या प्रकणावरून गुन्हा दाखल करण्यात आला नाही. गेल्या अनेक दिवसांपासून भाजप आणि महाविकास आघाडी विरुद्ध संघर्ष बघायला मिळत होता. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष एकमेकांवर सातत्याने आरोप करीत होते. त्यामुळे या प्रकरणामुळे पुढे काय राजकीय घडामोडी घडणार ते आता पहाणं महत्वाचं ठरणार आहे.
“सोमय्या पळणारा नेता नाही, पळवणारा नेता आहे”; प्रवीण दरेकांचा आघाडीवर निशाणा
दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून भाजपसह सत्ताधारी पक्षातील नेते कोल्हापुरात ठाण मांडून बसले आहेत. खास करून काॅंग्रेस नेते सतेज पाटील यांची या ठिकाणी प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे काॅंग्रेसकडून ही जागा आपल्या गोठात आणण्यासाठी चारी बाजून फिल्डिंग लावली जात आहे.
Read also:
- “रूख हवाओं में बदला, तो खाक वो भी होंगे”; सोमय्यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर राऊतांची प्रतिक्रिया
- किरीट सोमय्यांना न्यायालयाचा मोठा दणका; जामीनपुर्व अर्ज न्यायालयाने फेटाळला
- गुणरत्ने सदावर्तेंचा कोठडीतील मुक्काम वाढला; न्यायालयाने 13 एप्रिलपर्यंत दिली पोलीस कोठडी
- सदावर्तेंनी कर्मचाऱ्यांच्या मनात विष कालवलं, त्यामुळे अनेकांनी जीवन संपवलं; राष्ट्रवादीचा गंभीर आरोप
- “सदावर्ते काॅलेजला सलग 4 वेळा नापास”; वैद्यकीय महाविद्यालयाने लावला होता ‘Debar rule’