मुंबई : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मागील अनेक दिवसांपासून महाविकास आघाडी सरकार आणि या सरकारमधील वजनदार मंत्र्यांना अडचणीत आण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक, मुंबई महानगरपालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, शिवसेनेचे इतर काही नेते यांच्याविरोधात किरीट सोमय्या यांनी सातत्याने आक्रमक भूमिका घेतली.
“मनसेला जवळ केल्यास फटका बसू शकतो, याचा अंदाज भाजपला आला असेल”; जयंत पाटलांचा टोला
नुकतीच त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्याबद्दल आणि त्यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्याविरोधात ईडीला काही महत्वपूर्व माहिती आणि कागदपत्रे सुपूर्द केली होती. त्यानंतर संजय राऊत यांच्याविरोधात ईडीकडून कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर संजय राऊत यांनीही तितक्याच आक्रमकतेने किरीट सोमय्या यांच्याविरोधात माहिती गोळा केली होती.
..तर पक्षांवर देखील कारवाई होईल; विक्रांत प्रकरणावरून सरकारी वकिलांनी दिला इशारा
संजय राऊत यांनी आयएनएस विक्रांत बचाव मोहिमेत घोटाळा झाला होता असं वक्तव्य पत्रकार परिषेदत केलं आणि दोनच दिवसांत किरीट सोमय्या आणि निल सोमय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी ट्रॉमबे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि किरीट सोमय्या यांना चौकशीसाठी बोलविण्यात आले होते.
मुख्यमंत्र्यांनी मला संधी दिली, मात्र घाणेरड्या राजकारणामुळे राजीनामा द्यावा लागला; संजय राठोड
मात्र किरीट सोमय्या यांनी चौकशीला उपस्थित न राहता अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून कोर्टाकडे मागणी केली होती. आज त्यावर सुनावणी झाली आणि किरीट सोमय्या यांना धक्का बसला आहे. आयएनएस विक्रांत बचाव मोहीम अंतर्गत झालेल्या आर्थिक व्यवहारांबाबत झालेल्या आजच्या सुनावणीत किरीट सोमय्या यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. सत्र न्यायालयाने सोमय्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली असून, त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे.सोमय्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्या जामिनावर उद्या फैसला होणार आहे.
Read also:
- गुणरत्ने सदावर्तेंचा कोठडीतील मुक्काम वाढला; न्यायालयाने 13 एप्रिलपर्यंत दिली पोलीस कोठडी
- सदावर्तेंनी कर्मचाऱ्यांच्या मनात विष कालवलं, त्यामुळे अनेकांनी जीवन संपवलं; राष्ट्रवादीचा गंभीर आरोप
- “सदावर्ते काॅलेजला सलग 4 वेळा नापास”; वैद्यकीय महाविद्यालयाने लावला होता ‘Debar rule’
- राज ठाकरे बाळासाहेबांचे पुतणे, वारसदार नाहीत; रामदास आठवलेंचं वक्तव्य
- “सोमय्या पळणारा नेता नाही, पळवणारा नेता आहे”; प्रवीण दरेकांचा आघाडीवर निशाणा