मुंबई : राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून मेळाव्यांचे आयोजन करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या परिवार संवाद यात्रेचे हे पाचवे सत्र जयंत पाटलांच्या नेतृत्वाखाली सुरू होत आहे. त्याआधी त्यांनी राज ठाकरे आणि भाजपवर जोरदार प्रहार केला.
मनसेला धक्क्यावर धक्के! धुळ्याच्या उपमहानगर प्रमुखांनी दिला राजीनामा
राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याचा तपास गृहमंत्री दिलीप वळसे पाटील सक्षमपणे करून कडक कारवाई करतील. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला खतपाणी कुणी घातले, त्या आंदोलनात प्रक्षोभक भाषणे कुणी केली, न्यायालयाच्या निर्णयानंतर पेढे वाटणारे कोण होते, याचा शोध घेण्याची आवश्यकता व्यक्त करतानाच या प्रकरणाचा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील सक्षमपणे तपास करून कडक कारवाई करतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
कोल्हापूर उत्तरेचे मैदान कोण मारणार? भाजपसह बंटी पाटलांनीही लावली ‘टाईट फिल्डिंग’
आजपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवार संवाद यात्रेचे पाचवे पर्व सुरू होत असून दौर्यावर जाण्यापूर्वी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधत पवार साहेबांच्या घरावरील हल्ला आणि मनसे-भाजपची परिस्थिती यावर भाष्य केले. त्यावेळी पवार साहेबांच्या घरावर झालेल्या हल्ल्याची गृहमंत्री दिलीप वळसे पाटील अगदी खोलात जाऊन माहिती घेत असून योग्य ती कारवाई करत आहेत.
“फुलेंना भारतरत्न मिळेपर्यंत शांत बसणार नाही”; काॅंग्रेस नेत्याची केंद्र सरकारकडे मागणी
दरम्यान, पवार साहेबांच्या घरावर झालेला भ्याड हल्ला निंदनीय आहे. त्यामुळे हा प्रकार घडवण्यामागे कोण होते हे शोधण्याची गरज आहे, असेही जयंत पाटील यांनी सांगितले. मुंबईमध्ये मनसेला जवळ केल्यावर भाजपला किती मोठा फटका बसू शकतो याचा अंदाज त्यांना आला असेल म्हणूनच सध्या भाजपकडून मनसेचा फक्त वापर चालू आहे, असा टोलाही जयंत पाटील यांनी यावेळी लगावला.
Read also:
- ..तर पक्षांवर देखील कारवाई होईल; विक्रांत प्रकरणावरून सरकारी वकिलांनी दिला इशारा
- मुख्यमंत्र्यांनी मला संधी दिली, मात्र घाणेरड्या राजकारणामुळे राजीनामा द्यावा लागला; संजय राठोड
- “साहेबांनी सांगितलं की, उद्या तु सभेला ये, भेटीनंतर मी समाधानी”; वसंत मोरे
- शरद पवारांच्या घरावरील हल्ल्यामागील मुख्य सुत्रधार शोधा; काॅंग्रेस नेत्याची मागणी
- भाजपच्या हुकुमी एक्काला अटक होणार! न्यायालयाच्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष