धुळे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांच्या विरोधात जी भूमिका घेतली होती. त्याचा जबर फटका सध्या मनसेला भोगावा लागत आहे. कारण राज ठाकरेंच्या भूमिकेनंतर मनसेच्या अनेक मुस्लिम कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले आहेत. पुण्यात देखील शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी विरोधात भूमिका घेतल्याने त्यांना पदावरून हटवण्यात आलं. अशातच आता धुळे जिल्ह्यातील उपमहानगर प्रमुख साहिल खान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचा शरद पवारांच्या घरावर हल्ला! परिवहनमंत्र्यांनी दिला ‘हा’ कडक इशारा
साहिल खान यांनी पदाचा राजीनामा दिलाच परंतु मनसे सोडण्याचा देखील निर्णय घेतला आहे. साहिल खान गेल्या सात वर्षापासून मनसेतून लोकांची सेवा करीत होते. अलिकडेच त्यांनी सामान्य माणसांसाठी एक रूग्णवाहिका खरेदी केली होती. त्यावर राज ठाकरे आणि मनसेचा लोगो लावला होता. त्यांनी आतापर्यंत मनसेतून अनेक चांगली कामे केली आहेत. त्यामुळे त्यांच्यासह तेथील अनेक मुस्लिम कार्यकर्त्यांनी मनसे सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
“आज एसटी कर्मचाऱ्यांचा मृतदेह आढळला? एक ना एक दिवस पवारांना नियती धडा शिकवणार”
आता पर्यंत प्रमुख 4 मुस्लिम कार्यकर्त्यांनी मनसेतून राजीनामा दिले आहेत. राज ठाकरे यांच्या भूमिकेनंतर अनेक राजकीय नेत्यांनी त्यांच्यावर टिका केली होती. त्यावर प्रत्युत्तर देण्यासाठी राज ठाकरे उद्या 12 एप्रिल सभा घेणार आहेत. त्यात राज ठाकरे विरोधकांना प्रत्युत्तर आणि मनसेची पुढील भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे.
राजकीय वातावरण तापलं! पवारांच्या घरावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी मुख्यमंत्री-गृहमंत्र्यांची बैठक
दरम्यान, गुढीपाडव्याच्या दिवशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे खाली उतरवण्याचा इशारा दिला होता. तसेच भोंगे न उतरवल्यास त्यापुढे मोठ्या आवाजात हनुमान चालिसा लावण्यात येईल असा आदेश देण्यात आला. त्यांच्या या निर्णयावर त्यांच्यावर चौफेर टिका करण्यात आली.
Read also:
- कोल्हापूर उत्तरेचे मैदान कोण मारणार? भाजपसह बंटी पाटलांनीही लावली ‘टाईट फिल्डिंग’
- “फुलेंना भारतरत्न मिळेपर्यंत शांत बसणार नाही”; काॅंग्रेस नेत्याची केंद्र सरकारकडे मागणी
- “आम्ही सत्तेसाठी भाजपप्रमाणे हपापलेले नाही”! उद्धव ठाकरेंचा भाजपविरूद्ध एल्गार
- तर त्याच्या दुप्पट चोप आम्ही पण देऊ! राष्ट्रवादीचा मनसेला इशारा
- सदावर्तेंना 2 दिवसांची पोलीस कोठडी! शरद पवारांच्या बंगल्यावरील प्रकरण भोवणार