कोल्हापूर : कोल्हापूर उत्तरेत आता प्रचार यंत्रणा थांबल्या आहेत. काल कोल्हापूर उत्तरेत प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने महाविकास आघाडी, भाजपच्या दिग्ग्ज नेत्यांनी उपस्थिती दर्शविली होती. भाजपकडून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेतली, तर महाविकास आघाडीकडून पालकमंत्री बंटी पाटील यांची सभा आणि या सभेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ऑनलाईन पद्धतीने मार्गदर्शन केले.
“आज एसटी कर्मचाऱ्यांचा मृतदेह आढळला? एक ना एक दिवस पवारांना नियती धडा शिकवणार”
आता दोन दिवसांनंतर मतदान होणार आहे. कसबा बावडा, शिवाजीपेठ या ठिकाणी ज्या पक्षाला जास्त मतदान मिळणार तो उमेदवार विजयी होणार असा इतिहास या ठिकाणचा आहे. कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांचा कसबा बावडा, शिवाजी पेठ भागावर कमालीचा दबदबा आहे. या परिसरातून विरोधकांना मतदान होणार नाही याची पुरेपूर काळजी बंटी पाटलांनी घेतली आहे.
राजकीय वातावरण तापलं! पवारांच्या घरावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी मुख्यमंत्री-गृहमंत्र्यांची बैठक
कसबाबावडा, शिवाजीपेठ भागात बंटी पाटलांनी आपले शेकडो कार्यकर्ते कामाला लावले आहेत. गोकुळ, जिल्हा बँके प्रमाणे विधानसभेलाही बंटी पाटलांची टाईट फिल्डिंग आता महाविकास आघाडीला विजयाच्या जवळ नेणार का ? हे पाहणे औत्सुकतेचे ठरणार आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा एक आहे तो म्हणजे मतदानापूर्वी होणारे लक्ष्मीदर्शन. ठराविक भागात ‘लक्ष्मीदर्शन’ हा प्रकार महत्वाचा असणार आहे.
“माझी हत्या होऊ शकते”! न्यायालयात नेण्याआधी सदावर्तेंचं धक्कादायक वक्तव्य
दुसरीकडे भाजप असो किंवा महाविकास आघाडी, दोन्ही उमेदवारांकडून उच्चभ्रू, श्रीमंत लोक, वकिल, उद्योजक यासारख्या व्यक्तींच्या स्वतंत्र बैठका घेऊन आपली भूमिका मांडण्यात आली आहे . जाहीर प्रचाराची सांगता काल झाली असली तरी सोशल मिडीयासारख्या प्रभावी अस्त्राचा वापर करून अजूनही प्रचार सुरूच आहे. जो पर्यंत मतदान होत नाही तो पर्यंत हे सर्व सुरुचं राहणार अशी परिस्थिती देखील समोर आली आहे.
मतदानासाठी अजून दोन रात्री शिल्लक असल्याने रात्र वैऱ्याची म्हणत दोन्ही बाजुंनी कार्यकर्ते डोळ्यात तेल घालून मतदारसंघात फिरत आहेत. आपला प्रयोग विरोधकांच्या लक्षात येणार नाही, अशा पद्धतीने हा प्रकार सुरू आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांचा राबताही अशा वस्तीत आहे. आता कोल्हापूर उत्तरेचे मैदान कोण मारणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
Read also:
- “फुलेंना भारतरत्न मिळेपर्यंत शांत बसणार नाही”; काॅंग्रेस नेत्याची केंद्र सरकारकडे मागणी
- “आम्ही सत्तेसाठी भाजपप्रमाणे हपापलेले नाही”! उद्धव ठाकरेंचा भाजपविरूद्ध एल्गार
- तर त्याच्या दुप्पट चोप आम्ही पण देऊ! राष्ट्रवादीचा मनसेला इशारा
- सदावर्तेंना 2 दिवसांची पोलीस कोठडी! शरद पवारांच्या बंगल्यावरील प्रकरण भोवणार
- एसटी कर्मचाऱ्यांचा शरद पवारांच्या घरावर हल्ला! परिवहनमंत्र्यांनी दिला ‘हा’ कडक इशारा