मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी जोरदार भाषण केलं. त्यानंतर राज्यात त्या भाषणाचा परिणाम दिसून आलं. अशातच मुंब्रा येथे मनसेच्या वाहतुक सेनेच्या कार्यालयावर काही समाजकंटकांनी दगडफेक आणि तोडफोड केली. त्यानंतर ही कार्यालयाची तोडफोड राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून करण्यात आली असल्याचा आरोप केला जात आहे. त्यावर आता राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचा शरद पवारांच्या घरावर हल्ला! परिवहनमंत्र्यांनी दिला ‘हा’ कडक इशारा
मुंब्रा येथे मनसेच्या वाहतुक सेनेच्या कार्यालयावर झालेल्या दगडफेकीशी आमचा काहीही संबंध नाही. राष्ट्रवादी हा पक्ष संविधानावर निष्ठा ठेवणारा पक्ष आहे, असे कृत्य करीत नाही. असं राष्ट्रवादी काॅंग्रेसचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी म्हटलं आहे. तसेच कुणी अंगावर आलं तर तर त्यांना शिंगावर घ्यायाला आम्ही सक्षम आहोत. तसेच कुणी चोप द्यायाची भाषा करत असेल तर आम्हीही त्यांना दुप्पट चोप देऊ असा इशारा देखील त्यांनी दिला.
भ्रष्टाचारावरून नेत्यांवर गरळ ओकणारे सोमय्या थेट ‘नॉट रिचेबल’; INS विक्रांत प्रकरण भोवणार
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी हिंदुत्वाचा मुद्या उपस्थित करत मशिदीवरील भोंग्यावर बोट ठेवलं. त्यामुळे मुस्लिम समाज नाराज झाल्याने मनसेतील अनेक मुस्लिम कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले.
तुमचे कॅमरे पोहचले, मात्र पोलीस पोहचले नाहीत; थोरातांचा आघाडीला घरचा आहेर
दरम्यान, पुण्यात देखील याचा जोरदार परिणाम बघायला मिळाले, पुणे मनसे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी त्यांच्या विरोधात भूमिका घेतल्याने त्यांना पदावरून हटवण्यात आलं . त्यामुळे सध्या मनसेत आलबेलचं चित्र निर्माण झालं आहे.
Read also:
- सदावर्तेंना 2 दिवसांची पोलीस कोठडी! शरद पवारांच्या बंगल्यावरील प्रकरण भोवणार
- एसटी कर्मचाऱ्यांचा शरद पवारांच्या घरावर हल्ला! परिवहनमंत्र्यांनी दिला ‘हा’ कडक इशारा
- “आज एसटी कर्मचाऱ्यांचा मृतदेह आढळला? एक ना एक दिवस पवारांना नियती धडा शिकवणार”
- राजकीय वातावरण तापलं! पवारांच्या घरावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी मुख्यमंत्री-गृहमंत्र्यांची बैठक
- “माझी हत्या होऊ शकते”! न्यायालयात नेण्याआधी सदावर्तेंचं धक्कादायक वक्तव्य