मुंबई : गेल्या पाच महिन्यांपासून सुरू असलेलं एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन काल अचानकपणे चिघळलं. त्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत थेट राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ला केला. एसटी कर्मचाऱ्यांनी चिथवण्याप्रकरणी अॅड. गुणरत्ने सदावर्ते यांना पोलिसांनी कालच ताब्यात घेतलं. त्यांनतर त्यांच्यावर आज न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्याआधी त्यांनी खळबळजनक व्यक्तव्य केलं आहे.
ते एसटी कर्मचारी नव्हतेच! 2000 रूपये देऊन आलेले भाडोत्री आंदोलक होते?
सदावर्ते यांना एसडी मार्गांवरून न्यायालयात नेत असताना त्यांनी म्हटलं की, माझी हत्या होऊ शकते. लोकशाहीचा गळा घोटला जात आहे. असं खळबळजनक वक्तव्य केलं आहे. अशाच प्रकारची भिती गुणरत्ने सदारवर्त यांची पत्नी जयश्री पाटिल यांनी देखील व्यक्त केली आहे. त्यामुळे न्यायालयात आज सुनावणीत कशाप्रकराची माहिती समोर येणार त्याकडे लक्ष लागून आहे.
“जे आपण जन्मी करतो ते ह्याच जन्मी फेडावांच लागतं”; उदयनराजेंचा शरद पवारांना टोला
न्यायालयात गुणरत्ने सदावर्ते यांची बाजू त्यांच्या पत्नी जयश्री पाटील आणि तीन वकिल मांडणार आहेत. न्यायमुर्ती के. जी. सावंत यांच्या खंडपीठासमोर सदावर्ते यांची सुनावणी होणार आहे. त्यामुळे जयश्री पाटिलबरोबर महेश वाधवानी, घनश्याम उपाध्यय आणि सदावर्ते हे त्यांची बाजू मांडणार आहेत.
“सदावर्तेनां अटक हे तर शरद पवारांचे कपटी कारस्थान “; सदावर्तेंच्या पत्नीचे गंभीर आरोप
दरम्यान, आझाद मैदानावर 7 एप्रिल रोजी एसटी कर्मचाऱ्यांसमोर गुणरत्ने सदावर्ते यांनी धक्कादायक भाषणं केलं होतं. त्या भाषणांची चौकशी होणार, असं या अगोदर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं आहे. त्यामुळे शरद पवारांच्या बंगल्यावर झालेल्या हल्ल्याबाबत गुणरत्ने सदावर्ते यांना हे प्रकरण चांगलचं भोवणार असण्याची शक्यता आहे.
Read also:
- भ्रष्टाचारावरून नेत्यांवर गरळ ओकणारे सोमय्या थेट ‘नॉट रिचेबल’; INS विक्रांत प्रकरण भोवणार
- तुमचे कॅमरे पोहचले, मात्र पोलीस पोहचले नाहीत; थोरातांचा आघाडीला घरचा आहेर
- गुलाल उधळूनही ‘मिठाचा खडा’ कुठे पडला? कालच्या प्रकारामुळे एसटी आंदोलन संपुष्टात येईल का?
- मीडियाला माहितं होतं, मग पोलिसांना का नव्हतं! अजित पवारांचा थेट गृहमंत्र्यांना सवाल
- काल गुलाल उधळण्यात आला, मग सिल्व्हर ओकवर जाण्याचा उद्देश काय? अजित पवारांचा सवाल