मुंबई : गेल्या पाच महिन्यांपासून एसटीच्या कर्मचाऱ्यांनी विलगीकरणाच्या मागणीवरून मुंबईच्या आझाद मैदानासह संपूर्ण राज्यात बेमुदत संप पुकारला होता. एसटीच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या या संपामुळे एसटी महामंडळासहित जनतेलाही मोठा तोटा सहन करावा लागला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर एसटी कर्मचाऱ्यांचा संप शेवटी संपला आहे.
“अज्ञात शक्ती पडद्यामागून वातावरण चिघळवत आहे”; राऊतांची एसटी आंदोलनावर प्रतिक्रिया
त्यानंतर मात्र राज्यात चांगल्याच खळबळजनक घटना घडून आल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर थेट चप्पलफेक करण्यात आली. खासदार सुप्रिया सुळे यादेखील उपस्थित होत्या. त्यांनी आंदोलकांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला मात्र तरीही आंदोलन चिघळले. अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी केलेल्या भडखाऊ भाषणामुळे हे आंदोलन चिघळले अशी माहिती समोर आली आहे. या प्रकरणी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आली आहे. भारतीय दंड विधान १४१, १४९, ३५३, ३३२, ४५२, १२० ब आणि ४४८ आदी कलमांच्या आधारे गुणरत्ने यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
शरद पवारांच्या घरांवरील हल्ला ठरवून करण्यात आला; दोषींवर कारवाई होणार: गृहमंत्री
या प्रकरणी आणखी एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. सध्या तरी ही माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे असं बोलल्या जात आहे. जेष्ठ नेते शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्यात सर्वच एसटी कर्मचारी नव्हते. काही लोकं चिंचवड आणि परळी भागातील होते. एवढंच नाही तर दोन हजार रुपये हजेरीने या लोकांना बोलविण्यात आले होते अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
50 वर्षातील राजकारणाचा काय उपयोग? संन्यास घ्या; नितेश राणेंचा शरद पवारांवर निशाणा
जेष्ठ नेते शरद पवार यांच्या घरावर झालेल्या चप्पल फेकिप्रकरणी आता सातत्याने एका मागून एक खळबळजनक घडामोड समोर आली आहे. आता गुणरत्न सदावर्ते यांनीही अटक झाल्यानंतर माझ्या जीवाला धोका आहे, मला ते ठार मारू शकतात असं देखील वक्तव्य केलं आहे. १०६ आंदोलकांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
Read also:
- “जे आपण जन्मी करतो ते ह्याच जन्मी फेडावांच लागतं”; उदयनराजेंचा शरद पवारांना टोला
- “सदावर्तेनां अटक हे तर शरद पवारांचे कपटी कारस्थान “; सदावर्तेंच्या पत्नीचे गंभीर आरोप
- लोकशाहीचा गळा चिरडून मारण्याचं काम; धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया
- पवार साहेबांच्या घरावर दगडफेक करण्याचे कारण काय? जयंत पाटलांचा सवाल
- ‘पॉलिटिकल महाराष्ट्र’ च्या वृत्ताला महापालिका आयुक्तांच्या निर्णयाने पुष्टी; अण्णा बनसोडे ‘पॉलिटिकल कॉर्नर’च!