मुंबई : एसटीचं विलिनीकरण न करण्यामागे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हेच सुत्रधार असल्याचं सांगत आज एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली. हजारो एसटी कर्मचाऱ्यांच्या संख्येने शरद पवारांच्या बंगल्यावर त्यांनी दगडफेक आणि चप्पला फेकल्या. त्यामुळे त्याठिकाणी मोठ्या गोंधळ्याचं वातावरण तयार झालं. त्यावर आता राज्यातील विविध नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या आंदोलनामागे काही अज्ञात व्यक्तींचा समावेश असल्याचं सांगितलं आहे. याच पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
कोल्हापूरात महाविकास आघाडीचाच उमेदवार विजयी होणार; हसन मुश्रीफांचा विश्वास
संजय राऊत म्हणाले की, एसटी कर्मचाऱ्यांसाठी सर्व उपाय केले आहेत. त्यांच्या मागण्या मान्य झाल्या आहेत. तरीही काही तरी अज्ञात शक्ती पडद्यामागून वातावरण चिघळवण्याचं, बिघडण्याचं काम करत आहेत. एका विशिष्ट गटाला चिथावणी देऊन, डोके भडकावून अशी कृत्य घडावीत यासाठी प्रयत्न सूरू आहे असा आरोप देखील यावेळी संजय राऊत यांनी केला आहे.
वसंत मोरेंच्या हकालपट्टीनंतर पुण्यात मनसेला गळती; पदधिकाऱ्यांच्या राजीनाम्यांनी खळबळ
ते पुढे बोलताना म्हणाले की, शरद पवार हे संसदीय लोकशाही मानणारे नेते आहेत. आंदोलन, मोर्चै हा लोकांचा हक्क आहे. असं मानणारे ते आहेत. ज्या पद्धतीने लोकांनी शरद पवारांच्या घरांवर आंदोलन सुरू केलं. त्याला खासदार सुप्रिया सुळें निर्भिडपणे सामोरे गेल्या. त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. हात जोडून विनंत्या करताना दिसल्या. समोरून ज्या प्रकारची भाषा आणि वर्तन होतं हे लोकशाहीला शोभणारं नाही. या लोकांचे नेते कोण आहेत. ते पाहावं लागेल त्यांचे संस्कार काय आहेत. ते पहावे लागेल, असंही ते म्हणालेत.
ज्यांची औकात नाही, त्यांना तुरूंगात टाका; अबु आझमींचा राज ठाकरेंवर निशाणा
दरम्यान, एसटी विलिनीकरणाच्या मुद्य़ावर एसटी कर्मचारी अजूनही ठाम आहेत. न्यायालयाने दिलेला निर्णय अन्यायकारी असल्यानं त्यांनी यावेळी म्हटलं आहे. शरद पवार यांनी कोणत्याही बैठका घडवून आणलेल्या नाहीत. पवार हे विलिनीकरणार न होण्यामागचे सुत्रधार असल्याचं काही कर्मचाऱ्यांनी म्हटलं आहे. महाविकास आघाडी सरकारने 124 एसटी कर्मचाऱ्यांचा खून केल्याची संतप्त प्रतिक्रिया देखील यावेळी एसटी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.
Read also:
- शरद पवारांच्या घरांवरील हल्ला ठरवून करण्यात आला; दोषींवर कारवाई होणार: गृहमंत्री
- 50 वर्षातील राजकारणाचा काय उपयोग? संन्यास घ्या; नितेश राणेंचा शरद पवारांवर निशाणा
- एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवारांच्या बंगल्यावर चपला अन् बांगड्या फेकल्या
- “वसंत मोरेंचं पद गेल्यामुळे मनसेत फटाके वाजलेत अन् तात्या ढसाढसा रडले”
- “वसंत मोरेंचं पद गेल्यामुळे मनसेत फटाके वाजलेत अन् तात्या ढसाढसा रडले”