पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुण्यात वसंत मोरे यांची शहर अध्यक्ष पदावरून हकालपट्टी केल्यांनतर आता पुणे मनसेत गळतील सुरुवात झाली आहे. मनसेचे प्रमुख राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंग्याच्या बाबतीत वक्तव्य केल्यानंतर मनसेला आता मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या हिंदुत्ववादी भूमिकेविरोधात जाहीरपणे भाष्य केल्याने वसंत मोरेंचे शहराध्यक्ष पदावरून तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर वसंत मोरे हे माध्यमांशी बोलतांना त्यांच्या डोळ्यातून पाणी आले.
राष्ट्रवादीसह मुख्यमंत्र्यांचा देखील वसंत मोरेंना फोन! शिवसेनेत येण्याचं केलं आव्हान
वसंत मोरे यावेळी म्हणाले की, ज्या गोष्टींची मला भीती होती, ती मी मांडली होती. मी इतक्या वर्षात यांच्यावर प्रेम केलं आहे. हे असंच कधी मिळत नाही. माध्यमांत फक्त एवढचं बोललो की हे असं काही होणार नाही. तर लगेच बोलायला लागले की साहेबांचा आदेश मोडला वगैरै. इतकं बोलले आणि त्यांच्या डोळ्यात पाणीच आलं. माझी भूमिका मी पक्षासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. 2007 पासून 2017 पर्यंत इथले मुस्लिम बांधव एका हिंदूसाठी कायम पुढे आले आहेत. परंतु यांच्या दारात जाऊन भोंगे वाजवायचे, काहीतरी भूमिका घ्यायची, एकमेकांशी वाद घालायचे ही माझी कधी भूमिका नव्हती. असंही त्यांनी स्पष्ट केले.
यशंवत जाधवांना आयकर विभागाचा झटका ! 40 मालमत्तांवरसह 26 फ्लॅट्सवरही जप्तीची कारवाई
या सर्व प्रकारानंतर वसंत मोरे यांना राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून पक्षात येण्याच्या ऑफर्स आल्या आहेत. शिवसेनेचे युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी फोन करून वसंत मोरे यांच्याशी चर्चा केली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही वसंत मोरेंशी संपर्क साधला आहे. रुपाली ठोंबरे यांनीही राष्ट्रवादीत येण्यासाठी मोरेंना खुली ऑफर दिली होती.
कोल्हापुरची निवडणुक सोपी समजून घोडचूक करू नका; चंद्रकांत पाटलांचा ‘मविआ’ इशारा
राज ठाकरेंच्या हिंदुत्ववादाच्या आणि भोंगे हटविण्याच्या भूमिकेमुळे पुण्यातील मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. वसंत मोरेंना सध्या पाहता येणाऱ्या पक्ष प्रवेशाच्या ऑफर्स बघता ते किती दिवस मनसेत अजून टिकू शकतात याबाबतही मनसेत संभ्रम आहे. आगामी काळात होणाऱ्या घडामोडींवर मनसेचे भवितव्य कसे असेल ? हे आता लवकरच कळू शकते.
Read also:
- कोल्हापूरात महाविकास आघाडीचाच उमेदवार विजयी होणार; हसन मुश्रीफांचा विश्वास
- वसंत मोरेंच्या हकालपट्टीनंतर पुण्यात मनसेला गळती; पदधिकाऱ्यांच्या राजीनाम्यांनी खळबळ
- ज्यांची औकात नाही, त्यांना तुरूंगात टाका; अबु आझमींचा राज ठाकरेंवर निशाणा
- माझी राजकीय अथवा आत्महत्या झाली नाही; वसंत मोरे यांचा रूपाली पाटलांना प्रत्युत्तर
- 16 वर्षाचा फ्लॅश बॅक आठवला अन् डोळ्यात पाणी आलं! मनसे उपाध्यक्षांनी दिला राजीनामा