पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात बंडाची भूमिका घेतल्याने वसंत मोरे यांना शहारध्यक्ष पदावरून हटवण्यात आलं. त्यानंतर त्यांच्याजागी राज ठाकरे यांनी साईनाथ बाबर यांची मनसे पुणे शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली. मात्र पुण्याताली मनसेची खदखद अजूनही थांबलेली नाही आहे. कारण मनसेच्या पुणे शहर उपाध्यक्ष अझरूद्दीन बशीर सय्यद यांनी देखील राजीनामा दिल्याने पुण्यात मनसेतील चित्र बदलत चाललं आहे.
“दादा..! जिथे कुठे असाल तिथून परत या ;” चंद्रकांत पाटलांच्या आठवणीत कोथरुडकरांची बॅनरबाजी
गुढीपाडव्याच्या दिवशी राज ठाकरे यांनी मशिदीसमोर हनुमान चालिसे लावण्याचे आदेश दिले होते. वंसत मोरे यांनी आपल्या प्रभागात कार्यकर्त्यांनी शांतता ठेवावी असं म्हणत राज ठाकरे यांचा आदेश त्यांनी धुडगावून लावला होता. त्यानंतर मुस्लिम समाजाच्या या आदेशामुळे भावना दुखावल्या असल्याने मनसेच्या काही पुण्यातील कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले. त्यानंतर वसंत मोरे यांनी त्यांची भेट घेत समजूत काढली. त्यानंतर लगेचच वसंत मोरे यांना शहराध्यक्ष पदावरून हटवण्यात आलं.
“ते आम्हाला ठार मारतील, त्याची तयारी आहे, मात्र पुढील 25 वर्ष भाजप सत्तेत येणार नाही”
पुण्यातील माजीद अमीन शेख हे वॉर्ड क्रमांक 84 शाखा अध्यक्ष होते. त्यांनी सर्वप्रथम मनसेचा राजीनामा दिला. त्याचबरोबर मनसेचे प्रदेश सचिव इरफान शेख यांनी देखील यावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी फेसबुकवर असं म्हटलं आहे की, आमच्या भावना कुठे व्यक्त करायच्या? आज समाजात सामोरे जाताना जाणीव झाली. 16 वर्षाचा फ्लॅश बॅक आठवला आणि डोळ्यात पाणी आलं. तसेच मुस्लिम पदाधिकारी बैठक घेऊन पुढील निर्णय घेतील, अंसही त्यांनी म्हटलं आहे.
कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? नारायण राणेंचा संजय राऊतांवर घणाघात
दरम्यान, मनसे वाहतुक सेनेचे उपाध्यक्ष पंजाबी यांनीही देखील राजीनामा देत पदभार सोडला आहे. त्यामुळे मनसेला आता पुण्यात मोठी खिंडार पडली असल्याचं बोललं जात आहे. कारण त्या अगोदर रूपाली पाटील यांनी पक्षाच्या अंतर्गत राजकारणामुळे मनसेला सोडचिट्टी देत त्यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. अशातच आता काही महिन्यांवर महापालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यामुळे मनसे आता पुढची कोणती पावलं उचलणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Read also:
- राष्ट्रवादीसह मुख्यमंत्र्यांचा देखील वसंत मोरेंना फोन! शिवसेनेत येण्याचं केलं आव्हान
- यशंवत जाधवांना आयकर विभागाचा झटका ! 40 मालमत्तांवरसह 26 फ्लॅट्सवरही जप्तीची कारवाई
- कोल्हापुरची निवडणुक सोपी समजून घोडचूक करू नका; चंद्रकांत पाटलांचा ‘मविआ’ इशारा
- संजय राऊत यांचं लक्ष पक्षप्रमुख पदावर की मुख्यमंत्री पदावर? भाजप नेत्याचा राऊतांना सवाल
- वसंत मोरे, साईनाथ बाबर यांची चाय पे चर्चा! शहराध्यपदी निवड झाल्यानं केलं अभिनंदन