कोल्हापूर : उत्तरेचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या अकाली निधनामुळे सध्या कोल्हापूर उत्तरेत पोटनिवडणूक लागली आहे. भाजपकडून सत्यजित कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महाविकास आघाडीकडून स्वर्गीय. आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना काँग्रेस पक्षाची उमेवारी देण्यात आली आहे.
खरा मावळा! गेल्या 27 वर्षापासून साहेबांसोबत आहे आणि पुढेही राहणार; वसंत मोरे
भाजपकडून चंद्रकांत पाटील, माजी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी सत्यजित कदम यांना निवडून आण्यासाठी जीवाचे रान केले आहे. दुसऱ्या बाजूला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील, माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी जयश्री जाधव यांना निवडून आणण्यासाठी दिवस रात्र एक केले आहे.
भाजपच्या जवळ जो व्यक्ती, पक्ष गेला, तो संपला! रोहित पवारांचा राज ठाकरेंना सल्ला
भाजप विरुद्ध महाविकास आघाडीत कोल्हापूर उत्तरेच्या जागेसाठी जोरदार संघर्ष करण्यात आला आहे. एकमेकांवर वैयक्तिक टीकाटिप्पणी, ईडीच्या धमक्या, सभांवर दगडफेक अशा सर्वच खळबळजनक गोष्टी या पोटनिवडणुकीत पाहायला मिळाल्या आहेत. पोटनिवडणूक कोल्हापूरची असली तरी महाराष्ट्रातील प्रमुख नेते या निवडणुकीत प्रचार करताना दिसत आहेत. दोन दिवसांपूर्वी महाविकास आघाडीकडून युवा मंत्र्यांची, आमदारांची फौज कोल्हापूर उत्तरेत उतरवली होती.
वसंत मोरेंची अखेर शहराध्यक्ष पदांवरून हाकालपट्टी! साईनाथ बाबर नवे शहराध्यक्ष
दरम्यान, दुरीकडे मुंबईहून भाजपचे आमदार आशिष शेलार, चित्रा वाघ या देखील कोल्हापुरात आलेल्या आहेत. पुण्यातील कोथरूडचे आमदार असणारे चंद्रकांत पाटील हे गेल्या दोन महिन्यांपासून कोल्हापुरात आहेत. स्वतःचा मतदारसंघ सोडून या भागात असल्याने कोथरुडकरांनी पुणेरी स्टाईल फ्लेक्स बोर्ड लावत चंद्रकांत पाटील यांची आठवण काढली आहे. दादा एक महिना झाला तुमचा शोध कुठेच लागत नाही. आम्ही तुम्हाला काही बोलणार नाही. तुम्ही जिथे कुठे असाल तिथून परत या, आम्ही तुमची वाट पाहतोय असं म्हणत कोथरूडमध्ये बॅनरबाजी करण्यात आली आहे.
Read also:
- कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? नारायण राणेंचा संजय राऊतांवर घणाघात
- “ते आम्हाला ठार मारतील, त्याची तयारी आहे, मात्र पुढील 25 वर्ष भाजप सत्तेत येणार नाही”
- अभिनेत्री आसावरी जोशी यांचा राष्ट्रवादीत प्रवेश; अजित पवार यांची उपस्थिती
- बकरी, वाघाच्या लढाईत बकरीला वाचवणं गरजेचं! एसटी कर्मचाऱ्यांना आता २२ एप्रिलची दिली तारीख
- वसंत भाऊ तुमची हत्या केली की, आत्महत्या हे सर्व महाराष्ट्र पाहत आहे; रूपाली पाटलांची प्रतिक्रिया