मुंबई : गुढीपाडव्याच्या दिवशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे खाली उतरावा, अन्यथा हनुमान चालिसा लावण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता. राज ठाकरे यांच्या आव्हांना प्रतिसाद देत राज्यात काही ठिकाणी मंदिरांवर हनुमान चालिसा लावण्यात आली. तर पुण्यात या संदर्भात पुणे शहराध्यक्ष वसंत मोरेंनी बंडाची भूमिका आपल्याला प्रभागात शांतता ठेवावी असं सांगितलं होतं. त्याचाच परिणाम म्हणून मनसेतून वसंत मोरे यांना शहराध्यक्ष पदावरून हटवण्यात आलं आहे. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. तर यावर राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या नेत्या रूपाली पाटील यांनी वसंत मोरेंची राजकीय हत्या झाल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
तुम्ही तर काय $$$? काय कापलं सांगा? राऊतांची फडणवीसांवर टीका करताना जीभ घसरली
वसंत मोरे यांनी पाडव्यानंतर जी भूमिका घेतली होती. ती त्यांनी प्रभागाचा विचार केला होता. पक्षांतून अनेकांचा खांदेपालट होते. पंरतु ज्या पद्धतीची वसंत मोरेंची खांदेपालट झाली आहे. ती अत्यंत दुर्दैवी आहे. वंसत मोरे यांनी प्रभाग शांत ठेवावा अशी भूमिका घेतली. पंरतु त्यापेक्षा साईनाथ बाबरच्या प्रभागात 70 टक्के मुस्लिम मतदार आहेत. त्यामुळे साईनाथ बाबर यांनी कुठली राजकीय खेळी खेळली. ते अत्यंत दुर्दैवी आहे.
देशद्रोही किरीट सोमय्यांची वकिली फडणवीसांनी करू नये; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
मनसेच्या अंतर्गत खेळीमुळे त्यांचं शहराध्यक्ष पद गेलं आहे. मी देखील राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये प्रवेश करताना मला देखील या राजकारणाला तोंड द्यावं लागलं. त्यामुळे वसंत भाऊ तुमची हत्या केली आत्महत्या हे सर्व महाराष्ट्र पाहत आहे. अंसही त्या म्हणाल्यात वसंत मोरे बोलताना म्हणाले की, मनसे आणि राज ठाकरे साहेब माझ्या मनात कायम आहे. मनसे सोडण्याचा विचार अजून माझ्या मनात आलेला नाही आहे. ज्यावेळी मनात विचार आला त्यावेळी मी सर्वांसमोर सांगेन. तसेच गेल्या काही दिवसापासून माझं अनेक नेत्यांशी संपर्क होत आहे. माझं वय 47 आहे आणि गेल्या 27 वयापासून मी राज ठाकरे यांच्यासोबत आहे आणि पुढेही राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
वसंत मोरेंची अखेर शहराध्यक्ष पदांवरून हाकालपट्टी! साईनाथ बाबर नवे शहराध्यक्ष
दरम्यान, वसंत मोरे यांच्या जागी आता साईनाथ बाबर यांची मनसे पुणे शहर अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. राज ठाकरेंवर नाराजी व्यक्त करत पुण्यात मुस्लिम कार्यकर्त्यांनी देखील राजीनामे दिले आहेत. त्यामुळे वसंत मोरे यांच्या हाकालपट्टीमुळे आता मनसेला गळती लागली आहे. तसेच सकाळी वसंत मोरे हे मनसेच्या व्हॉट्सअप ग्रुपमधून देखील लेप्ट झाले होते. त्यामुळे वसंत मोरे आता काय भूमिका घेणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Read also:
- खरा मावळा! गेल्या 27 वर्षापासून साहेबांसोबत आहे आणि पुढेही राहणार; वसंत मोरे
- भाजपच्या जवळ जो व्यक्ती, पक्ष गेला, तो संपला! रोहित पवारांचा राज ठाकरेंना सल्ला
- वसंत मोरेंची अखेर शहराध्यक्ष पदांवरून हाकालपट्टी! साईनाथ बाबर नवे शहराध्यक्ष
- शेतकऱ्यांना घेऊन किरीट सोमय्या इडीच्या दरबारी! नवी राजकीय खेळी करण्याच्या तयारीत
- तुमच्याच पक्षाचे नेते मलिकांपेक्षा संजय राऊत जास्त महत्वाचे का? इम्तियाज जलीलांचा सवाल