IMPIMP

तुमच्याच पक्षाचे नेते मलिकांपेक्षा संजय राऊत जास्त महत्वाचे का? इम्तियाज जलीलांचा सवाल

imtiaz-jalil-questions-sharad-pawar-on-sanjay-raut-and-nawab-malik-cases

मुंबई :  शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर काल इडीने कारवाई केली. त्यानंतर लगेचच संजय राऊत हे दिल्लीत शरद पवार, नितीन गडकरी आणि काही आमदारांच्या समवेत चहापानाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. त्याचबरोबर आज शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जवळपास 25 मिनिटे बैठक पार पडली. त्या बैठकीत संजय राऊत आणि 12 आमदारांचा मुद्या उपस्थित केला असल्याचं शरद पवारांनी काल पत्रकार परिषेद स्पष्ट केलं. याचाच धागा पकडत एमआयएमचे खासदार इम्तियाझ जलील यांनी नवाब मलिक यांच्यावरून प्रश्न उपस्थित केला आहे.

राऊतांना जप्तीबद्दल आधी कल्पना द्यायला हवी होती; इडीच्या कारवाईवर जयंत पाटलांची प्रतिक्रिया 

इम्तियाझ जलील म्हणाले की, तुमचेचे नेेते नवाब मलिक यांना अटक होऊन ते तरूंगात आहेत. असं असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींना यासंदर्भात भेटण्याची तत्परता का दाखवली नाह? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. फक्त संजय राऊत यांच्याबद्दल चर्चा का ? तुमच्या पक्षाचेच मंत्री नवाब मलिक यांना अटक झाली तेव्हा तुमच्या इतक्या गडबडीत मोंदींशी चर्चा करावीशी वाटली नाही? की संजय राऊत नवाब मलिकांपेक्षा जास्त महत्वाचे आहेत. तुमच्याकडे खेळण्यासाठी स्वत:चे खेळ आहेत. असंही ते म्हणालेत.

“अचूक भविष्यवाणी करणारे गृहस्थ म्हणून सोमय्यांची महाराष्ट्रात नवी ओळख” 

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यासंदर्भात देखील शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी सांगितलं की याबाबतदेखील आम्ही काही चर्चा केली नाही. सुधीर मुनगंटीवार यांना प्रत्युत्तर देताना शरद पवार म्हणाले की, राष्ट्रवादी कधीही भाजपसोबत नव्हती. तसेच राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि शिवसेना सध्या भाजपविरोधात उभी आहे. दुसऱ्यांच्या सांगण्यावरून राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार नाही.  त्याचबरोबर संजय राऊतांवरील कारवाईची गरज नव्हती असंही ते म्हणालते.

संपत चाललेला पक्ष दंगलीवर उभा करू नका; वचिंतचा राज ठाकरेंवर निशाणा

दरम्यान, शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात जवळपास 20 ते 25 मिनिटे चर्चा झाली होती. या भेटीनंतर शरद पवारांनी पत्रकार परिषद घेऊन कोणकोणत्या मुद्यांवर चर्चा झाली. याबाबत भाष्य केलं. यावेळी शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेच्या वेळी लक्षद्वीपचे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे खासदरा मोहम्मद फैजलही उपस्थित होते.

Read also:

Total
0
Shares
Previous Article
rauts-tongue-slipped-while-criticizing-fadnavis

तुम्ही तर काय $$$? काय कापलं सांगा? राऊतांची फडणवीसांवर टीका करताना जीभ घसरली

Next Article
kirit-somaiya-is-preparing-to-play-a-new-political-game-with-the-farmers

शेतकऱ्यांना घेऊन किरीट सोमय्या इडीच्या दरबारी! नवी राजकीय खेळी करण्याच्या तयारीत

Related Posts
Total
0
Share