मुंबई : गुढीपाडव्याच्या दिवशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्या उपस्थित करत मशिदीवरील भोंग्यांना विरोध दर्शविला. त्यानंतर राज ठाकरे यांच्य आव्हांना राज्यातील काही ठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी मंदिरावर मोठ्या प्रमाणात आवाज देऊन हनुमान चालिसा वाजवण्यात आली. मात्र पुण्यात याचा उलट परिणाम बघायला मिळाला. राज ठाकरेंच्या वक्तव्यांमुळे मनसेच्या मुस्लिम कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले. अशातच आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचा मुलगा सुजात आंबेडकर यांनी राज ठाकरे यांना आव्हान दिलं आहे.
4 दिवसात भोंगे उतरावा अन्यथा..; मशिदीवरील भोंग्यांवरुन मनसे पुण्यात करणार खळखट्याक?
सुजात आंबेडकर यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना म्हटलं आहे की, मुस्लिमांच्या अंगाला हातही लावू देणार नाही. आता त्यांची जाबाबदारी आमची आहे. उच्चवर्णीय ब्राम्हण बहुजनांच्या पोरांना भडकावण्याचं काम करत आहेत. वंचित बहुजन आघाडी वेळ पडली तर रस्त्यावर देखील उतरेल. जर अमित ठाकरेंना हनुमान चालिसा येत नसेल तर इतरांच्या पोरांना सांगण्याचा हक्क तुम्हाला कुणी दिला? असा सवाल देखील त्यांनी केला आहे.
इडीने थेट राष्ट्रवादीच्या भोंग्यावरच केली कारवाई; मनसेची राऊतांवर खोचक टीका
महाविकास आघाडीनं पुरोगामीत्वाची चादर पांघरलीय. तर संधी आहे राज ठाकरेंवर कारवाई करा, मशिदीच्या बाजूला भोंगे लागतील या वक्तव्यावर आक्षेप आहे, कारवाई व्हायला हवी, संपत चाललेला पक्ष दंगलीवर उभा करू नका, अंस देखील त्यांनी म्हटलं आहे.
दिल्लीत शरद पवार, मोदींची भेट! इडीच्या कारवाईनंतर राजकीय घडामोडींना वेग
दरम्यान, पुण्यात मशिदीवरील भोंग्यांवरून मनसेत वसंत मोरे आणि हेमंत संभूस असे दोन गट तयार झाले आहेत. त्यामुळे राजकीय घडामोडी जोर धरू लागल्या आहेत. पुण्यातील डेक्कन परिसरातील सर्व मशिदीवरील अनधिकृत भोंगे काढण्याबाबत मनसे पोलिस ठाण्यात पत्र दिले आहेत. त्यांनी डेक्कन पोलीस स्टेशन, विश्रामबाग, फरासखाना पोलिस स्टेशन ला याबाबत पत्र दिले आहेत. त्याचबरोबर त्यांनी पोलिसांना भोंगे काढण्य़ाचा 4 दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. जर भोंगे काढले नाहीतर त्याच्या दुप्पट पटीने स्पीकर लावून हनुमान चालिसाचे पठण करणार असल्याचं हेमंत संभुस यांनी म्हटलं आहे.
Read also:
- संजय बियाणीच्या मारेकऱ्यांच्या मुसक्या लवकरच आवळणार; अशोक चव्हाण
- राज ठाकरे सुरूवातीला भाजपविरोधात होते, मात्र आता बदलले; शरद पवार
- राऊतांवर अन्याय झालाय, ही कल्पना मी मोदींना दिली; मोदींच्या भेटीनंतर पवारांची प्रतिक्रिया
- मशिदीवरील भोंग्यांचा वाद चिघळला! राज ठाकरेंच्या नावाला काळं फासलं
- काही लोक नखं कापूनही शहीद होण्याचा प्रयत्न करताहेत; इडीच्या कारवाईवर फडणवीसांची प्रतिक्रिया