नवी दिल्ली : राज्यात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर इडीने कारवाई केली. त्यांची अलिबागजवळील जमीन आणि दादर मधील फ्लॅट इडीने जप्त केला आहे. राज्यात इडीने कारवाई केली तरी सांयकाळी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, नितीन गडकरी यांच्यासोबत काल सांयकाळी संजय राऊतांनी चहापानाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. अशातच आता शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्याने राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
राज ठाकरेंचा आदेश हा अंतिम; वसंत मोरेंच्या भूमिकेनंतर मनसेत दोन प्रवाह
दिल्ली येथील निवासस्थानी शरद पवार, नितीन गडकरीसमवेत राज्यातील अनेक आमदारांनी संजय राऊतांच्या घरी चाहापानाचा कार्यक्रम पार पडला. त्यावेळी संजय राऊत हे नितीन गडकरी यांच्याच बाजूला बसले होते. संजय राऊतांवर झालेली इडीची कारवाई, अन् नितीन गडकरींच्या बाजूला बसल्याने संजय राऊतांबाबत काल चांगलीच चर्चा रंगली होती.
“कोल्हापूर उत्तरेत सत्यजित कदम मतदानाआधीच विजयी”; चंद्रकांत पाटलांचा दावा
आज शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्यात जवळपास 25 मिनिटें चर्चा झाली. मात्र ही चर्चा कशाबद्दल झाली, ती माहिती अजूनही गुलदस्तात आहे. त्यामुळे शरद पवार नरेंद्र मोदींच्या भेटींची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात चांगलीचं रंगली आहे.
निलेश लंकेंच्या निकटवर्तीयांची दबंगगिरी; पाणीपुरवठा अभियंत्याला मुख्य अधिकाऱ्यांसमोरच चोप
दरम्यान, राज्यातील आमदारांचा काल अभ्यास प्रशिक्षण झालं. त्यावेळी त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांच्यासोबत फोटो सेशन देखील पार पाडलं. तर काॅंग्रेसच्या आमदारांनी सोनिया गांधी आणि मलिका अर्जून खर्गे यांची देखील भेट घेतली आहे. जे मंत्री काम करीत नाहीत. त्यांचं मंत्रीपद बदलण्यात यावं अशा प्रकाराच्या चर्चा झाल्याचं बोलण्यात येत आहे.
Read also:
- गिरीश महाजन जिलेबी, संजय राऊत सुरी तर किरीट सोमय्या भोंगा; पेडणेकारांची जोरदार फटकेबाजी
- एसटी कर्मचाऱ्यांनो हजर व्हा..! उच्च न्यायालयाने दिले १५ एप्रिल पर्यंत हजर राहण्याचे आदेश
- आयएनएस विक्रांत प्रकरण! किरीट सोमय्यांचं संजय राऊतांना आव्हान
- आयएनएस विक्रांतचा ७० कोटी रुपयांचा निधी गेला कुठे? सोमय्यांकडे बोट दाखवत राऊतांचा सवाल
- एखाद्या किल्ल्याचे बुरुज ढासाळायला लागले ना की..; वसंत मोरेंची मुस्लिम कार्यकर्त्यांच्या घरी भेट