पारनेर : मागील काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात नगरपंचायतीच्या निवडणुकांचा निकाल लागला. यामध्ये काही प्रतिष्ठेच्या नगरपंचायतींच्या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर नगरपंचायतीकडे विशेष लक्ष लागले होते. माजी विधानसभा उपाध्यक्ष विजय औटी विरुद्ध एकेकाळचे कट्टर समर्थकी आणि विद्यमान आमदार निलेश लंके यांच्यात खुली लढत याठिकाणी पाहायला मिळणार होती. राज्यात महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात असताना पारनेरमध्ये मात्र शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात लढत झालेली पाहायला मिळाली.
देशात खरंच लोकशाही राहिली आहे का? राऊतांवरील इडीच्या कारवाईनंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
कोणत्याही पक्षाला बहुमत मात्र या पंचायतीमध्ये मिळाले नाही. दोन अपक्षांना सोबत घेऊन आमदार लंकेनी राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष बसवला. मात्र आता या नगराध्यक्षाने पारनेरमध्ये चांगलीच दबंगगिरी केल्याचे चित्र समोर आले आहे. थेट स्वच्छता आणि पाणीपुरवठा विभागाचे अभियंता सचिन राजभोज यांना नगराध्यक्ष विजय औटी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली आहे.
राजकीय वातावरण तापलं! इडीची राऊतांवरील कारवाई अन् भाजपच्या माजी मंत्र्यांला 3 महिन्यांचा कारावास
नगरपंचायतीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुनीता कुमावत यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, मात्र तरीही विजू औटी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी अभियंतांना त्यांच्या समोरच मारहाण केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येत आहे.
“संजय राऊत हे धुतल्या तांदळाचा माणूस नाही”; इडीच्या कारवाईनंतर निलेश राणेंची प्रतिक्रिया
पारनेर शहरातील पाणीपुरवठा विभागातील बंद पडलेल्या मोटारी जमा करण्याचे काम नुकतेच सुरु करण्यात आले होते. ते वेळेच्या आत पूर्ण न झाल्यामुळे नगराध्यक्ष विजय औटी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप होत असला तरी अद्यापही या प्रकरणात फिर्याद देण्यात आलेली नाही. निलेश लंके यांचे निकटवर्तीय असलेल्या विजू औटी यांनी थेट सरकारी अधिकाऱ्याला मारहाण केल्याने राज्यभर हा चर्चेचा विषय ठरत आहे.
Read also:
- साहेब भरपावसात भिजले अन् सत्ता स्थापन झाली; तिकडे आघाडीचीही पावसातील सभा गाजली
- भाजपचे माजी मंत्री अनिल बोंडेंना 3 महिन्याचा तुरूंगवास; नायब तहसीलदार मारहाण प्रकरणी
- हिंदू एकता आवाज आलाच पाहिजे, मंदिरावरील भोंगे मोफत देऊ; भाजप नेत्याची घोषणा
- राजू शेट्टींची मोठी घोषणा; शेतकरी संघटना महाविकास आघाडीतून बाहेर
- ‘मविआ’ मंत्रिमंडळात होणार मोठे फेरबदल; नाना पटोलेंची काँग्रेस हायकमांडकडे सेटिंग