पुणे : गेल्या काही दिवसापासून महाविकास आघाडीतील नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणाचा ससेमिरा पाठिमागे लागला आहे. अशातच आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केली आहे. त्यांची अलिबाग येथील मालमत्ता इडीने जप्त केली आहे. त्यामुळे राज्यातील राजकारण चांगलचं तापण्याची शक्यता आहे. ईडीच्या कारवाईनंतर अशातच आता संजय राऊत यांनी मी कुणाच्या बापाला घाबरत नाही, अशा कारवाईने मी किंवा शिवसेना खचणार नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर यावर राज्याचे पर्यावरण मंत्री आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी यावर महत्वपूर्ण भाष्य़ केले आहे.
शिवसेनेचे खासदार राष्ट्रवादीवर नाराज; दिल्लीतील बैठकीत महाविकास आघाडीत ‘बिघाडी’
संजय राऊतांवरील कारवाईबाबत आदित्य ठाकरे म्हणाले की, आपल्याला सरळ सरळ दिसत आहे ‘आपल्याला सरळ सरळ दिसत आहे हे सर्व राजकीय हेतूने होत आहे. कुठे ना कुठे तरी बदलाची भावना घेऊन हे सर्व होत आहे. हे आपल्या देशात जे काही चालले आहे ते लोकशाहीचे वातावरण नाही. हे राजकीय वातावरण नाही हे दवबावाचे राजकारण चालले आहे.
राज ठाकरे साहेबांवर नाराज नाही, पण भूमिका काय घ्यावी, समजत नाही? वसंत मोरे
ते पुढे बोलताना म्हणाले की, ज्या प्रमाणे राजकीय स्टेटमेंट पुढं यायला लागले आहे. कोणाला कधी अटक होणार कोणाला काय होणार त्यानुसार न्याय प्रक्रिया आणि लोकशाही या देशात आहे की नाही असा प्रश्न देखील पडतो. देशात खरंच लोकशाही राहिली आहे का यावर खूप मोठं विचार करण्याची गरज आहे. देश कुठल्या दिशेला चालला आहे याचा विचार व्हाययला हवं असं देखील यावेळी ठाकरे म्हणाले.
दरम्यान, आपल्या देशात लोकशाही आहे का हे विचार करण्याची गरज आहे. लोक जाहीर सभेत जनतेला धमकी द्यायला लागले आहे. मग देशात लोकशाही आहे का हा प्रश्न आहे. शिवसैनिक हे एकजूट येत आहे. जो समोरून येत आहे त्याला ताकत दिसेल. असं राज ठाकरे हे भाजपसोबत गेले नाही म्हणून परिणाम भोगावे लागतील असा प्रश्न पत्रकारांनी त्यांना विचारला होता. त्यावेळी त्यांनी असं उत्तर दिलं आहे.
Read also:
- राजकीय वातावरण तापलं! इडीची राऊतांवरील कारवाई अन् भाजपच्या माजी मंत्र्यांला 3 महिन्यांचा कारावास
- “संजय राऊत हे धुतल्या तांदळाचा माणूस नाही”; इडीच्या कारवाईनंतर निलेश राणेंची प्रतिक्रिया
- “माझ्या हत्येचा हिरेन पांड्या करण्याचा संबंधितांचा प्लॅन”; इडीच्या कारवाईनंतर राऊतांचा गंभीर आरोप
- त्यांची मानसिक तयारी होती तर..; इडीने राऊतांवर केलेल्या कारवाईवर भाजप नेत्यांची प्रतिक्रिया
- इडीचा संजय राऊतांना मोठा दणका; अलिबागजवळील जमीन, दादरमधील फ्लॅट जप्त