पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुडीपाडव्याच्या दिवशी मेळाव्यात वादळी भाषण करत महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केलीय. सरकारवर टीका करत असताना त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला. हिंदुत्वावरून थेट मुस्लिम समाजावर टीका करत जर ते भोंगे उतरवणार नसतील तर आम्ही देखील समोरच जास्तीच्या आवाजात हनुमान चालीसा पठण करू असं देखील त्यांनी म्हटलं.
“माझ्या हत्येचा हिरेन पांड्या करण्याचा संबंधितांचा प्लॅन”; इडीच्या कारवाईनंतर राऊतांचा गंभीर आरोप
याचा परिणाम मनसेच्या काही नेत्यांना भोगावा लागणार असं वाटत असताना आता पुण्यातून मनसेचे नगरसेवक आणि गटनेते वसंत मोरे यांनी राज ठाकरेंच्या मुस्लिमविरोधी वक्तव्यांवरून नाराजी व्यक्त केलीय. राज ठाकरेंच्या हिंदुत्वादी भूमिकेचा फटका पुण्यातील काही नगरसेवकांना बसण्याची शक्यता आता वर्तवली जातीय. अशातच आता भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी महत्वपूर्ण भाष्य़ केले आहे.
त्यांची मानसिक तयारी होती तर..; इडीने राऊतांवर केलेल्या कारवाईवर भाजप नेत्यांची प्रतिक्रिया
मोहित कंबोज यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, मंदिर में लगाने के लिए जिसको लाउड स्पीकर भोंगे चाहिए वो निशुल्क हमसे माँग सकता हैं ! सभी हिंदू की एक आवाज़ होनी चाहिए ! मंदिरावर हनुमान चालिसा यासाठी भोंगे आम्ही देवू ज्यांना लावायचे आहेत त्यांना ! हिंदु एकता आवाज आलाच पाहिजे, असं त्यांनी म्हटलं आहे.
इडीचा संजय राऊतांना मोठा दणका; अलिबागजवळील जमीन, दादरमधील फ्लॅट जप्त
दरम्यान, याविषयी मनसेचे पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक आणि गटनेते वसंत मोरे यांनी रोखठोक भूमिका मांडली आहे. माझ्या आणि नगरसेवक साईनाथ बाबर यांच्या प्रभागात मुस्लीम बहुल भाग जास्त आहे. राज साहेबांनी केलेल्या वक्तव्यामुळे आम्हाला विपरीत परिणामाला सामोरे जाऊ लागू शकते. सध्या तरी मी माझ्या प्रभागात शांतात कशी राखून ठेवता येईल याकडे लक्ष देऊन आहे. मी कोणतीही वेगळी भूमिका घेणार नाही. मात्र मला आता काय करावे ? हेच कळेनासे झाले आहे.
Read also:
- राजू शेट्टींची मोठी घोषणा; शेतकरी संघटना महाविकास आघाडीतून बाहेर
- ‘मविआ’ मंत्रिमंडळात होणार मोठे फेरबदल; नाना पटोलेंची काँग्रेस हायकमांडकडे सेटिंग
- देशात खरंच लोकशाही राहिली आहे का? राऊतांवरील इडीच्या कारवाईनंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
- राजकीय वातावरण तापलं! इडीची राऊतांवरील कारवाई अन् भाजपच्या माजी मंत्र्यांला 3 महिन्यांचा कारावास
- “संजय राऊत हे धुतल्या तांदळाचा माणूस नाही”; इडीच्या कारवाईनंतर निलेश राणेंची प्रतिक्रिया