कोल्हापूर : महाविकास आघाडीचे फायरब्रॅन्ड नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीकडून कारवाई करण्यात आली आहे. अलिबागमधील संजय राऊतांची असणारी संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. ईडीच्या कारवाईनंतर पत्रकारांना प्रतिक्रिया देताना संजय राऊतांनी म्हटलं की असल्या केंद्रीय यंत्रणांना मी फाट्यावर मारतो.
‘मविआ’ मंत्रिमंडळात होणार मोठे फेरबदल; नाना पटोलेंची काँग्रेस हायकमांडकडे सेटिंग
यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरातून संजय राऊतांच्या टीकेला उत्तर दिले आहे. संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदा सुरुवातील लोक आकर्षणाने बघायचे. मात्र आता हे सर्व लोकांना पटेनासे झाले आहे. पत्रकार परिषदेत दुसऱ्यांवर टीका करताना भिकारडे, उखडणार, कोलतो, वाकडं करणार का ? अशी भाषा वापरणे महाराष्ट्राची संस्कृती नसल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
देशात खरंच लोकशाही राहिली आहे का? राऊतांवरील इडीच्या कारवाईनंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
जर तुमचा केंद्रीय यंत्रणांवर भरोसा नसेल तर तुम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊन दाद मागू शकता असा सल्लाही पाटील यांनी दिला आहे. कोल्हापूर उत्तरेबद्दल बोलताना पाटील यांनी म्हटलं आहे की सत्यजित कदम यांचा विजय आता निश्चित झाला आहे. कोल्हापूरची सुज्ञ जनता आता महाविकास आघाडीच्या भूलथापांना बळी पडणार नाही असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी मारला आहे.
राजकीय वातावरण तापलं! इडीची राऊतांवरील कारवाई अन् भाजपच्या माजी मंत्र्यांला 3 महिन्यांचा कारावास
महाविकास आघाडीचे ५ ते ६ नेते हे भ्रष्टाचारामुळे आता तुरुंगात जाऊ शकतात. त्यांनी दिवसांपासून भ्रष्टाचार सुरूच ठेवला असल्यामुळे आता त्यांना कर्माची फळे भोगावी लागणार आहेत. कोल्हापुरात मी दोन दिवसांपूर्वी ईडीच्या कारवाईचा उल्लेख केला होता. .जनतेमध्ये जागृती होण्यासाठी मी तसं वक्तव्य केलं असं देखील चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. जनतेला मी केलेलं वक्तव्य आवडलं. पेटीएमचा वापर गेल्या दोन पोटनिवडणुकांमध्ये मी अत्यंत प्रखरतेने होताना बघितला आहे. काही कॉलेजेसची मुलं ग्रेस मार्क मिळावे म्हणून काही फॉर्म भरून घेतात आणि मी नंतर मतदारांच्या न कळत पैसे पेटीएम अकाउंटवर पाठवले जातात अशी माहितीही चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.
Read also:
- निलेश लंकेंच्या निकटवर्तीयांची दबंगगिरी; पाणीपुरवठा अभियंत्याला मुख्य अधिकाऱ्यांसमोरच चोप
- साहेब भरपावसात भिजले अन् सत्ता स्थापन झाली; तिकडे आघाडीचीही पावसातील सभा गाजली
- भाजपचे माजी मंत्री अनिल बोंडेंना 3 महिन्याचा तुरूंगवास; नायब तहसीलदार मारहाण प्रकरणी
- हिंदू एकता आवाज आलाच पाहिजे, मंदिरावरील भोंगे मोफत देऊ; भाजप नेत्याची घोषणा
- राजू शेट्टींची मोठी घोषणा; शेतकरी संघटना महाविकास आघाडीतून बाहेर