पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्याला हात घालत मशिदीवरील भोंगे काढले नाही तर त्यापेक्षा दुप्पट आवाजात मशिदीसमोर हनुमान चालीसा लावण्यात येईल असा इशारा दिला. त्यानंतर राज ठाकरेंच्या या भूमिकेवरून मनसेच्या नेते आणि कार्यकर्त्यांमध्येच संभ्रम दिसत आहे.
राजू शेट्टींची मोठी घोषणा; शेतकरी संघटना महाविकास आघाडीतून बाहेर
आजच मनसेचे पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे यांच्या भाषणाचा मतितार्थच समजलेला नाही. मनसेच्या कार्यकर्त्यांनी शांत राहिले पाहिजे. मी माझ्या प्रभागात तरी मशिदींसमोर भोंगे लावणार नाही, असे वसंत मोरे यांनी स्पष्ट केले आहे. त्यानंतर शहर मनसेत पक्षाध्यक्षांच्या आदेशावरूनच संभ्रम निर्माण झाल्याचे दिसत आहे. कारण राज्याचे सरचिटणीस आणि माजी शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी पक्षात राजसाहेबांचा आदेश अंतिम असून वयक्तिक भूमिकेला थारा नाही. असं ठणकावून सांगितलं आहे. पक्षाची भूमिका राजसाहेबांनी शिवतीर्थावरून मांडली आहे शहराध्यक्षची भूमिका ही पक्षाची भूमिका नाही असं शिंदे म्हणाले आहेत.
‘मविआ’ मंत्रिमंडळात होणार मोठे फेरबदल; नाना पटोलेंची काँग्रेस हायकमांडकडे सेटिंग
शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी मांडलेली भूमिका ही पक्षाच्या भूमिकेपेक्षा वेगळी त्यामुळे संभ्रम निर्माण झाले आहेत, म्हणून आम्ही आज समोर येऊन हे क्लेअर सांगत होत की राज साहेब जो आदेश देतील तो पक्षासाठी अंतिम असेल त्यात वयक्तिक भूमिकेला थारा नाही. वयक्तिक भूमिका मांडायची असेल तर ती पक्षांतर्गत मांडावी. असं देखील अजय शिंदे म्हणाले आहेत.
देशात खरंच लोकशाही राहिली आहे का? राऊतांवरील इडीच्या कारवाईनंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
दरम्यान, मनसे नेते हेमंत संभूस म्हणाले की, प्रत्येक मनसैनिक हनुमान चालीसा लावणारच त्याला कोणताही छेद नाही. राजसाहेब हे कोणतीही भूमिका मतांसाठी मांडत नाहीत. आम्ही अखंड हिंदुत्व स्वीकारलंय त्याला अनुसरून भूमिका राजसाहेब मांडत आहेत. त्यामुळे कुठली मत येतील कुठली जातील हा प्रश्नच येत नाही. असं संभूस म्हणाले आहेत. आता सरचिटणीस अजय शिंदे यांनी पुढे येऊन भूमिका मांडल्यानंतर राज ठाकरेंच्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शहर मनसेत दोन प्रवाह झाल्याचे स्पष्ट दिसत आहेत.
Read also:
- “कोल्हापूर उत्तरेत सत्यजित कदम मतदानाआधीच विजयी”; चंद्रकांत पाटलांचा दावा
- निलेश लंकेंच्या निकटवर्तीयांची दबंगगिरी; पाणीपुरवठा अभियंत्याला मुख्य अधिकाऱ्यांसमोरच चोप
- साहेब भरपावसात भिजले अन् सत्ता स्थापन झाली; तिकडे आघाडीचीही पावसातील सभा गाजली
- भाजपचे माजी मंत्री अनिल बोंडेंना 3 महिन्याचा तुरूंगवास; नायब तहसीलदार मारहाण प्रकरणी
- हिंदू एकता आवाज आलाच पाहिजे, मंदिरावरील भोंगे मोफत देऊ; भाजप नेत्याची घोषणा