पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुडीपाडव्याच्या दिवशी मेळाव्यात वादळी भाषण करत महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केलीय. सरकारवर टीका करत असताना त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला. हिंदुत्वावरून थेट मुस्लिम समाजावर टीका करत जर ते भोंगे उतरवणार नसतील तर आम्ही देखील समोरच जास्तीच्या आवाजात हनुमान चालीसा पठण करू असं देखील त्यांनी म्हटलं. याचा परिणाम मनसेचा शाखा अध्यक्ष माजिद शेख वाहतूक उपशहराध्यक्ष शहाबाज पंजाबी यांच्या घरी आज मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांनी भेट दिली. त्यांनी राज ठाकरे यांच्या वक्तव्यांवरून राजीनामा दिला आहे.
हिंदू एकता आवाज आलाच पाहिजे, मंदिरावरील भोंगे मोफत देऊ; भाजप नेत्याची घोषणा
एखाद्या किल्ल्याचे बुरुज ढासाळायला लागले ना की किल्ला पडायला ही वेळ लागत नाही. जेव्हा एखादा नेता पक्षाचा राजीनामा देतो ना तेव्हा नक्की त्याचा काहीतरी स्वार्थ असतो, पण जेव्हा एखादा शाखा अध्यक्ष , एखादा कार्यकर्ता राजीनामा देतो ना तेव्हा त्याला जरूर समजावून संगायला पाहिजे. अंस वंसत मोरे यांनी म्हटंल आहे.
राजू शेट्टींची मोठी घोषणा; शेतकरी संघटना महाविकास आघाडीतून बाहेर
शाखा अध्यक्ष माजिद शेख व वाहतूक उपशहराध्यक्ष शहाबाज पंजाबी यांच्या घरी गटनेते साईनाथ बाबर जनाधिकार शहराध्यक्ष नरेंद्र तांबोळी , उपशहराध्यक्ष आशिष देवधर , विभागाध्यक्ष गणेश भोकरे महिला विभागाध्यक्ष सौ.नीता पालवे उपशहराध्यक्ष अझहर सय्यद , एस टी कामगार शहर अध्यक्ष ललित तींडे , महिला उपविभागाध्यक्ष नाझ इनामदार , शाखाध्यक्ष सलीम सय्यद , मोहसीन शिकालकार , विजय रजपूत , संग्राम तळेकर यांचेसह भेटून आलो पोरांच्या चेहऱ्यावर काय हसू आलं राव, असंही त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.
‘मविआ’ मंत्रिमंडळात होणार मोठे फेरबदल; नाना पटोलेंची काँग्रेस हायकमांडकडे सेटिंग
दरम्यान, राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी मशिदीवरील भोंगे खाली उतरावा अन्यथा त्याठिकाणी हनुमान चालिसा वाजवण्यात येईल, असं म्हटलं होतं. राज ठाकरे यांच्या आव्हांना पाठिंबा देत मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी मंदिरांवर हनुमान चालिसा लावली, यावरून मुस्लिम समाज नाराज झाला. त्याचाच परिणाम म्हणून मनसेच्या काही मुस्लिम कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले आहेत.
Read also:
- राज ठाकरेंचा आदेश हा अंतिम; वसंत मोरेंच्या भूमिकेनंतर मनसेत दोन प्रवाह
- “कोल्हापूर उत्तरेत सत्यजित कदम मतदानाआधीच विजयी”; चंद्रकांत पाटलांचा दावा
- निलेश लंकेंच्या निकटवर्तीयांची दबंगगिरी; पाणीपुरवठा अभियंत्याला मुख्य अधिकाऱ्यांसमोरच चोप
- साहेब भरपावसात भिजले अन् सत्ता स्थापन झाली; तिकडे आघाडीचीही पावसातील सभा गाजली
- भाजपचे माजी मंत्री अनिल बोंडेंना 3 महिन्याचा तुरूंगवास; नायब तहसीलदार मारहाण प्रकरणी