मुंबई : राज्यात सध्या विविध कारणांमुळे राजकीय नेत्यांमध्ये चांगलाचं संघर्ष बघायला मिळत आहे. भाजप विरूद्ध संजय राऊत असा काहीसा संघर्ष अलिकडे जोर धरू लागला आहे. त्यामुळे भाजप असो किंवा सत्ताधारी एकमेकांवर टिका टिप्पणी करायला मागे पुढे पाहत नाहीत. अशातच झी मराठी वाहिनीवरील किचन कल्लाकार या मालिकेत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांना बोलवण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांनी चौफेर फटकेबाजी करत राजकीय नेत्यांचं नाव घेतलं आहे.
“कोल्हापूर उत्तरेत सत्यजित कदम मतदानाआधीच विजयी”; चंद्रकांत पाटलांचा दावा
झी मराठीवरील किचन कल्लाकार च्या सेटवर काल किशोरी पेडणेकर आणि चित्रा वाघ यांना बोलवण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांना एखादी गोष्ट दाखवून, ती पाहिली की कोणाचा चेहरा आठवतो, अशा पद्धतीचे प्रश्न विचारण्यात आले. हा भागाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. त्यात किशोरी पेडणेकर, चित्रा वाघ आणि रूपाली पाटील या सहभागी होणार आहेत.
निलेश लंकेंच्या निकटवर्तीयांची दबंगगिरी; पाणीपुरवठा अभियंत्याला मुख्य अधिकाऱ्यांसमोरच चोप
सुरूवातीला किशोरी पेडणेकर यांना जिलेबी दाखवण्यात आली. ती पाहून आपल्याला आमदार गिरीश महाजन यांचं नाव आठवतंय. तर सुरी दाखवण्यात आली असता किशोरी पेडणेकरांनी संजय राऊतांचं नाव घेतलं. त्याच बरोबर ज्यावेळी त्यांना भोंगा दाखवला. तेव्हा त्यांनी भाजपचे नेते किरीट सोमय्यांचं नाव घेतलं. त्यावेळी उपस्थितांमध्ये एकदमच हशा पिकला.
साहेब भरपावसात भिजले अन् सत्ता स्थापन झाली; तिकडे आघाडीचीही पावसातील सभा गाजली
दरम्यान, किशोरी पेडणेकर यांनी किरीट सोमय्यांचं नाव घेतल्यानंतर लगेचच चित्रा वाघ यांनी देखील प्रत्युत्तर दिलं. त्या म्हणाल्या की, भोंग्यांने सगळ्यांना जाग येते. त्याशिवाय कोणी झोपू शकत नाही. याआधी रोहित पवार, अमृता फडणवीस, आणि पंकजा मुंडे यांनी देखील या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.
Read also:
- एसटी कर्मचाऱ्यांनो हजर व्हा..! उच्च न्यायालयाने दिले १५ एप्रिल पर्यंत हजर राहण्याचे आदेश
- आयएनएस विक्रांत प्रकरण! किरीट सोमय्यांचं संजय राऊतांना आव्हान
- आयएनएस विक्रांतचा ७० कोटी रुपयांचा निधी गेला कुठे? सोमय्यांकडे बोट दाखवत राऊतांचा सवाल
- एखाद्या किल्ल्याचे बुरुज ढासाळायला लागले ना की..; वसंत मोरेंची मुस्लिम कार्यकर्त्यांच्या घरी भेट
- राज ठाकरेंचा आदेश हा अंतिम; वसंत मोरेंच्या भूमिकेनंतर मनसेत दोन प्रवाह