नांदेड : राज्यात गेल्या काही दिवसांपासून खून, दरोडा यांसारख्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. काल पुण्यात देखील सराफ दुकानात दुकान मालकाला कोयत्याचा धाक दाखून चोरट्यांनी सोनं तसेच रोकड लंपास केली. त्याचबरोबर पुण्यात तसेच राज्यातील प्रमुख शहरात हत्येच्या घटनांमध्ये देखील वाढ होत आहे. काल नांदेड शहरातील प्रसिद्ध बिल्डर संजय बियाणी यांची देखील अज्ञानांनी निर्घृण हत्या केली आहे. या घटनेमुळे महाराष्ट्र पुर्ण हादरून गेला आहे. आरोपींवर काठोर कारवाई केली जाईल असं राज्याचे सार्वजनित बांधकाम मंत्री आणि जिल्हाचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.
इडीने थेट राष्ट्रवादीच्या भोंग्यावरच केली कारवाई; मनसेची राऊतांवर खोचक टीका
ते बोलताना म्हणाले की, शहारातील प्रसिद्ध बिल्डर संजय बियाणी यांची कुणी हत्या केली, कशासाठी केली, यामागचे सुत्रधार कोण? याचा तपास लवकर लागावा यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी विजय कबाडे यांच्या नेतृत्वाखाली एसआयसी स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे या खुनाचा स्वतंत्रपणे तपास करून बियाणी यांचे मारेकरी आणि त्यांच्या सुत्रधारांच्या मुसक्या लवकरच आवळण्यात येतील असं त्यांनी म्हटलं आहे,
दिल्लीत शरद पवार, मोदींची भेट! इडीच्या कारवाईनंतर राजकीय घडामोडींना वेग
बियाणी एक दानशुर व्यक्ती होते. अगदी कमी काळात त्यांनी बांधकाम क्षेत्रात आपली ठसा उमटवला होता. अशा व्यक्तीची गोळ्या घालून ह्त्या होणे हे माझ्यासह नांदेडकरांसाठी देखील धक्कादायक आहे. अशा घटनांमुळे निश्चितच चिंता वाढली आहे. बियाणी यांचा खुुन झाला. त्याचे सुत्रधार कोण आहे? यावर आता भाष्य करणे योग्य नाही. त्याचा तपास पोलिस करीत आहे.
गिरीश महाजन जिलेबी, संजय राऊत सुरी तर किरीट सोमय्या भोंगा; पेडणेकारांची जोरदार फटकेबाजी
दरम्यान, बियाणी यांच्यावर काल अज्ञान व्यक्तींनी लगातार 13 गोळ्या झाडल्या होत्या. यांचं सर्व चित्रण सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झालं आहे. हे सीसीटिव्ही चित्रण काल दिवसभर सोशल मीडियावर फिरत होतं. त्यामुळे लोकांमध्ये चिंतेचे वातावरण तयार झाले आहे.
Read also:
- राज ठाकरे सुरूवातीला भाजपविरोधात होते, मात्र आता बदलले; शरद पवार
- राऊतांवर अन्याय झालाय, ही कल्पना मी मोदींना दिली; मोदींच्या भेटीनंतर पवारांची प्रतिक्रिया
- मशिदीवरील भोंग्यांचा वाद चिघळला! राज ठाकरेंच्या नावाला काळं फासलं
- काही लोक नखं कापूनही शहीद होण्याचा प्रयत्न करताहेत; इडीच्या कारवाईवर फडणवीसांची प्रतिक्रिया
- 4 दिवसात भोंगे उतरावा अन्यथा..; मशिदीवरील भोंग्यांवरुन मनसे पुण्यात करणार खळखट्याक?