मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर काल इडीने कारवाई केली. त्यानंतर लगेचच संजय राऊत हे दिल्लीत शरद पवार, नितीन गडकरी आणि काही आमदारांच्या समवेत चहापानाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. त्याचबरोबर आज शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जवळपास 25 मिनिटे बैठक पार पडली. त्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना ऊत आला. त्याबाबत आज शरद पवारांनी भेटीचं कारण सांगितलं आहे.
दिल्लीत शरद पवार, मोदींची भेट! इडीच्या कारवाईनंतर राजकीय घडामोडींना वेग
संजय राऊतांवरील इडीचा मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर मांडला आहे. त्याचबरोबर राज्यपालांकडे 12 आमदारांचा मुद्यांबाबत देखील चर्चा झाली आहे. त्यासंदर्भात नरेंद्र मोदी लवकरच निर्णय घेणार आहेत. तसेच महाराष्ट्रातीय सध्या ज्या कारवाया होत आहेत. त्यासंदर्भात आमच्यात काहीही चर्चा झाली नसल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केले आहे.
गिरीश महाजन जिलेबी, संजय राऊत सुरी तर किरीट सोमय्या भोंगा; पेडणेकारांची जोरदार फटकेबाजी
राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यासंदर्भात देखील शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी सांगितलं की याबाबतदेखील आम्ही काही चर्चा केली नाही. सुधीर मुनगंटीवार यांना प्रत्युत्तर देताना शरद पवार म्हणाले की, राष्ट्रवादी कधीही भाजपसोबत नव्हती. तसेच राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि शिवसेना सध्या भाजपविरोधात उभी आहे. दुसऱ्यांच्या सांगण्यावरून राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार नाही. त्याचबरोबर संजय राऊतांवरील कारवाईची गरज नव्हती असंही ते म्हणालेत.
एसटी कर्मचाऱ्यांनो हजर व्हा..! उच्च न्यायालयाने दिले १५ एप्रिल पर्यंत हजर राहण्याचे आदेश
दरम्यान, राज ठाकरेंच्या वक्तव्यांबाबत बोलताना ते म्हणाले की, राज ठाकरे सुरूवातीला भाजपविरोधात होते, मात्र आता बदलले आहेत असा टोला देखील लगावला. तसेच त्यांच्या कोणत्याही वक्तव्याला मी महत्व देत नाही असंही ते म्हणाले. शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात जवळपास 20 ते 25 मिनिटे चर्चा झाली होती. या भेटीनंतर शरद पवारांनी पत्रकार परिषद घेऊन कोणकोणत्या मुद्यांवर चर्चा झाली. याबाबत भाष्य केलं. यावेळी शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेच्या वेळी लक्षद्वीपचे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे खासदरा मोहम्मद फैजलही उपस्थित होते.
Read also:
- राऊतांवर अन्याय झालाय, ही कल्पना मी मोदींना दिली; मोदींच्या भेटीनंतर पवारांची प्रतिक्रिया
- मशिदीवरील भोंग्यांचा वाद चिघळला! राज ठाकरेंच्या नावाला काळं फासलं
- काही लोक नखं कापूनही शहीद होण्याचा प्रयत्न करताहेत; इडीच्या कारवाईवर फडणवीसांची प्रतिक्रिया
- 4 दिवसात भोंगे उतरावा अन्यथा..; मशिदीवरील भोंग्यांवरुन मनसे पुण्यात करणार खळखट्याक?
- इडीने थेट राष्ट्रवादीच्या भोंग्यावरच केली कारवाई; मनसेची राऊतांवर खोचक टीका