मुंबई : गेल्या काही दिवसापासून महाविकास आघाडीतील नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणाचा ससेमिरा पाठिमागे लागला आहे. अशातच आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केली आहे. त्यांची अलिबाग येथील मालमत्ता इडीने जप्त केली आहे. त्यामुळे राज्यातील राजकारण चांगलचं तापण्याची शक्यता आहे. ईडीच्या कारवाईनंतर अशातच आता संजय राऊत यांनी मी कुणाच्या बापाला घाबरत नाही, अशा कारवाईने मी किंवा शिवसेना खचणार नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.
आयएनएस विक्रांत प्रकरण! किरीट सोमय्यांचं संजय राऊतांना आव्हान
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, काही लोक नखं कापूनही शहीद होण्याचा प्रयत्न करत आहेत. मराठी माणसाच्या नावावर राजकारण करायचं आणि मराठी माणसाला लुटायचं हा धंदा मुंबईत कोण करतंय हे आता यावरून स्पष्ट झालं आहे. अशा तिखट शब्दात देवेंद्र फडणवीसांनी संजय राऊतांवर शब्दांचा भडीमार केला.
आयएनएस विक्रांतचा ७० कोटी रुपयांचा निधी गेला कुठे? सोमय्यांकडे बोट दाखवत राऊतांचा सवाल
संजय राऊत लक्ष वेधून घेण्यासाठी सर्व बोलत आहेत. आमच्या नेत्यांच्या घरात माणसे घुसवत माफं घेण्यात आली. नसलेल्या नोटीसी देण्याचं काम झालं. तरी आम्ही कायद्याने मुकाबला करण्याची भूमिका ठेवली. जे काही पुरावे आहेत. त्याच्या आधारे नोटीस दिली असून कायदेशीर नोटीस मिळाली असताना कायद्याने उत्तर दिलं पाहिजे. भावनिक उत्तर दिल्यास त्यावर लोकांचा विश्वास बसणार नसल्याचंही त्यांनी सांगितले.
एखाद्या किल्ल्याचे बुरुज ढासाळायला लागले ना की..; वसंत मोरेंची मुस्लिम कार्यकर्त्यांच्या घरी भेट
दरम्यान, इडीने आज संजय राऊत यांच्यावर कारवाई केल्यानंतर अतुल भातखळकर यांनी ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, मी तुरुंगात जायला तयार आहे, हे त्यांचे विधान म्हणजे मानसिक तयारी होती तर, असं म्हणत त्यांनी टोला लगावला आहे. संजय राऊत यांची अलिबागजवळील किहीमधील 8 भुखंड जप्त करण्यात आलं आहे. तसेच ईडीने 1 हजार 48 कोटींच्या प्रविण राऊत पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली असल्याचं म्हटलं जात आहे. संजय राऊतांचे स्नेही प्रविण राऊत यांनी घोटाळा केला आहे. यामध्ये संजय राऊत हे देखील सहभागी आहेत. त्यांच्या पत्नीच्या खात्यात देखील पैसा आलं आहे. असा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे.
Read also:
- 4 दिवसात भोंगे उतरावा अन्यथा..; मशिदीवरील भोंग्यांवरुन मनसे पुण्यात करणार खळखट्याक?
- इडीने थेट राष्ट्रवादीच्या भोंग्यावरच केली कारवाई; मनसेची राऊतांवर खोचक टीका
- दिल्लीत शरद पवार, मोदींची भेट! इडीच्या कारवाईनंतर राजकीय घडामोडींना वेग
- गिरीश महाजन जिलेबी, संजय राऊत सुरी तर किरीट सोमय्या भोंगा; पेडणेकारांची जोरदार फटकेबाजी
- एसटी कर्मचाऱ्यांनो हजर व्हा..! उच्च न्यायालयाने दिले १५ एप्रिल पर्यंत हजर राहण्याचे आदेश