कोल्हापूर : कोल्हापूर उत्तरेत सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा टप्पा असल्याने दोन्ही प्रमुख पक्षांकडून एकमेकांवर टीका टिप्पणी सुरु आहे. महाविकास आघाडीकडून बंटी पाटलांनी कमान सांभाळली आहे तर चंद्रकांत पाटील भाजपकडून मैदानात उभे ठाकले आहेत.
संजय बियाणीच्या मारेकऱ्यांच्या मुसक्या लवकरच आवळणार; अशोक चव्हाण
कोल्हापुरात सध्या भाजपकडून मुंबईमधील काही नेते प्रचारासाठी आले आहेत. यामाध्ये आमदार आशिष शेलार, चित्रा वाघ यांचा समावेश आहे. आशिष शेलार यांनी राजारामपुरी येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेत पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटलांवर त्यांनी कोरोना काळात ३५ कोटींचा भ्रष्टाचारा केल्याचा गंभीर आरोप केला आणि त्यानंतर राजकीय वातावरण कमालीचं तापलं. वेळोवेळी भाजपला आव्हान देणाऱ्या बंटी पाटलांनी नेहमीप्रमाणे आशिष शेलारांनाही आव्हान केलं की या भ्रष्टाचाराच्या वक्तव्यबद्दल दिलगिरी व्यक्त करा अन्यथा अब्रुनुकसानीच्या नोटिशीला सामोरे जा. सतेज पाटील यांनी काल केलेल्या भाषणात आक्रमक होत भाजपवर सडकून टीका केली आहे.
राज ठाकरे सुरूवातीला भाजपविरोधात होते, मात्र आता बदलले; शरद पवार
भाजपच्या नेत्यांना कोल्हापुरात स्पष्ट पराभव दिसू लागल्याने ते आता वैफल्यग्रस्त होऊ लागले आहेत. काहींना काही उलट सुलट विधाने करणे हे त्याचेच द्योतक आहेत. भाजपचे माजी खासदार महिलांविषयी आक्षेपार्ह विधान करतात, प्रदेशाध्यक्ष थेट नागरिकांना ईडीची धमकी देतात ही सगळी बेताल वक्तव्ये म्हणजे त्यांना आपला पराभव दिसत असल्याचे द्योतक आहे, असा टोलाही सतेज पाटील यांनी भाजपला हाणला आहे.
राऊतांवर अन्याय झालाय, ही कल्पना मी मोदींना दिली; मोदींच्या भेटीनंतर पवारांची प्रतिक्रिया
कोल्हापूरच्या विकासासाठी गेल्या दोन दशकांपासून आमचे घराणे कार्यरत आहेत. छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा घेऊन आम्ही राजकारण करतो. त्यामुळे आमच्यावर कोणतेही आरोप करण्यापूर्वी त्याची योग्य शहानिशा करा अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशाराही त्यांनी आशिष शेलारांना दिल्याने आता निवडणुकीत रंगत वाढली आहे. सतेज पाटलांनी केलेल्या आव्हानाला आता भाजप काय उत्तर देणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
Read also:
- वसंत मोरेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चांना ऊत; रुपाली ठोंबरेंनी पाठराखण केल्याने संभ्रम
- सोमय्या पिता पुत्राविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल”; आयएनएस विक्रांत प्रकरण भोवणार
- राऊतांना जप्तीबद्दल आधी कल्पना द्यायला हवी होती; इडीच्या कारवाईवर जयंत पाटलांची प्रतिक्रिया
- “अचूक भविष्यवाणी करणारे गृहस्थ म्हणून सोमय्यांची महाराष्ट्रात नवी ओळख”
- संपत चाललेला पक्ष दंगलीवर उभा करू नका; वचिंतचा राज ठाकरेंवर निशाणा