मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेत्यांवरील केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाया वाढल्या आहेत. भाजपनेते किरीट सोमय्या हे महाविकास आघाडी सरकारवर सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. त्यामुळे आघाडीतील अनेक नेत्यांवर इडी, सीबीआयने कारवाया केल्या आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर देखील काल इडीने कारवाई केली आहे. अशातच आता राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी यावरून किरीट सोमय्यांवर निशाणा साधला आहे.
मशिदीवरील भोंग्यांचा वाद चिघळला! राज ठाकरेंच्या नावाला काळं फासलं
जयंत पाटील म्हणाले की, अचूक भविष्यवाणी करणारे गृहस्थ म्हणून किरीट सोमय्यांची महाराष्ट्रात नवी ओळख निर्माण होत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांना जप्तीबद्दल आधी कल्पना द्यायला हवी होती. एकंदरीतच या सर्व प्रकरणातून संजय राऊत यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न होत आहे. दोन दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयानेसुद्धा ईडीच्या कारवायांबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यामुळे तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचे जगजाहीर आहे, असे जयंत पाटील म्हणाले.
काही लोक नखं कापूनही शहीद होण्याचा प्रयत्न करताहेत; इडीच्या कारवाईवर फडणवीसांची प्रतिक्रिया
जयंत पाटील म्हणाले की, अचूक भविष्यवाणी करणारे गृहस्थ म्हणून किरीट सोमय्यांची महाराष्ट्रात नवी ओळख निर्माण होत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांना जप्तीबद्दल आधी कल्पना द्यायला हवी होती. एकंदरीतच या सर्व प्रकरणातून संजय राऊत यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न होत आहे. दोन दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा ईडीच्या कारवायांबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यामुळे तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचे जगजाहीर आहे, असे जयंत पाटील म्हणाले.
4 दिवसात भोंगे उतरावा अन्यथा..; मशिदीवरील भोंग्यांवरुन मनसे पुण्यात करणार खळखट्याक?
दरम्यान, संजय राऊत यांची अलिबागजवळील किहीमधील 8 भुखंड जप्त करण्यात आलं आहे. तसेच ईडीने 1 हजार 48 कोटींच्या प्रविण राऊत पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली असल्याचं म्हटलं जात आहे. संजय राऊतांचे स्नेही प्रविण राऊत यांनी घोटाळा केला आहे. यामध्ये संजय राऊत हे देखील सहभागी आहेत. त्यांच्या पत्नीच्या खात्यात देखील पैसा आलं आहे. असा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे.
Read also:
- “अचूक भविष्यवाणी करणारे गृहस्थ म्हणून सोमय्यांची महाराष्ट्रात नवी ओळख”
- संपत चाललेला पक्ष दंगलीवर उभा करू नका; वचिंतचा राज ठाकरेंवर निशाणा
- संजय बियाणीच्या मारेकऱ्यांच्या मुसक्या लवकरच आवळणार; अशोक चव्हाण
- राज ठाकरे सुरूवातीला भाजपविरोधात होते, मात्र आता बदलले; शरद पवार
- राऊतांवर अन्याय झालाय, ही कल्पना मी मोदींना दिली; मोदींच्या भेटीनंतर पवारांची प्रतिक्रिया