मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेत्यांवरील केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाया वाढल्या आहेत. भाजपनेते किरीट सोमय्या हे महाविकास आघाडी सरकारवर सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. त्यामुळे आघाडीतील अनेक नेत्यांवर इडी, सीबीआयने कारवाया केल्या आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर देखील काल इडीने कारवाई केली आहे. अशातच आता राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी यावरून किरीट सोमय्यांवर निशाणा साधला आहे.
काही लोक नखं कापूनही शहीद होण्याचा प्रयत्न करताहेत; इडीच्या कारवाईवर फडणवीसांची प्रतिक्रिया
जयंत पाटील म्हणाले की, अचूक भविष्यवाणी करणारे गृहस्थ म्हणून किरीट सोमय्यांची महाराष्ट्रात नवी ओळख निर्माण होत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांना जप्तीबद्दल आधी कल्पना द्यायला हवी होती. एकंदरीतच या सर्व प्रकरणातून संजय राऊत यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न होत आहे. दोन दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयानेसुद्धा ईडीच्या कारवायांबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यामुळे तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचे जगजाहीर आहे, असे जयंत पाटील म्हणाले.
4 दिवसात भोंगे उतरावा अन्यथा..; मशिदीवरील भोंग्यांवरुन मनसे पुण्यात करणार खळखट्याक?
किरीट सोमय्या जे काही वक्तव्य करतात. त्या घटना आगामी दोन-चार दिवसांमध्ये घडतात. त्यामुळे अचूक भविष्यवाणी करणारे गृहस्थ म्हणून त्यांची महाराष्ट्रात नवी ओळख निर्माण होत आहे. केंद्रीय तपास यंत्रणा आपल्या कामाचा अहवाल नेहमी किरीट सोमय्यांना देत असतात असा एक आभास निर्माण झाला आहे. या कारवायांमुळे महाविकास आघाडी सरकारवर परिणाम होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. सरकार व सरकारशी संबंधित लोकांची बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे आणि त्यांच्याबद्दल संशय निर्माण करण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर होत असल्याचे चित्र आहे, असे त्यांनी सांगितले.
इडीने थेट राष्ट्रवादीच्या भोंग्यावरच केली कारवाई; मनसेची राऊतांवर खोचक टीका
दरम्यान, संजय राऊत यांची अलिबागजवळील किहीमधील 8 भुखंड जप्त करण्यात आलं आहे. तसेच ईडीने 1 हजार 48 कोटींच्या प्रविण राऊत पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली असल्याचं म्हटलं जात आहे. संजय राऊतांचे स्नेही प्रविण राऊत यांनी घोटाळा केला आहे. यामध्ये संजय राऊत हे देखील सहभागी आहेत. त्यांच्या पत्नीच्या खात्यात देखील पैसा आलं आहे. असा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे.
Read also:
- संपत चाललेला पक्ष दंगलीवर उभा करू नका; वचिंतचा राज ठाकरेंवर निशाणा
- संजय बियाणीच्या मारेकऱ्यांच्या मुसक्या लवकरच आवळणार; अशोक चव्हाण
- राज ठाकरे सुरूवातीला भाजपविरोधात होते, मात्र आता बदलले; शरद पवार
- राऊतांवर अन्याय झालाय, ही कल्पना मी मोदींना दिली; मोदींच्या भेटीनंतर पवारांची प्रतिक्रिया
- मशिदीवरील भोंग्यांचा वाद चिघळला! राज ठाकरेंच्या नावाला काळं फासलं