मुंबई : भाजपचे नेतेकिरीट सोमय्या हे गेल्या कित्येक दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहे. एका मागून एक त्यांनी आरोपांची रांगच लावली असल्याचं चित्र समोर आलं आहे. मात्र आता शिवसेना नेते संजय राऊत यांच्याकडून किरीट सोमय्यांवर तगडा असा पलटवार करण्यात आला आहे, ज्यामुळे सोमय्यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते.
राऊतांवर अन्याय झालाय, ही कल्पना मी मोदींना दिली; मोदींच्या भेटीनंतर पवारांची प्रतिक्रिया
परवा संजय राऊत यांच्या अलिबागमधील संपत्तीवर ईडीकडून टाच आणण्यात आली. यानंतर संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत ईडीला, केंद्रीय यंत्रणांना फाट्यावर मारतो असं वक्तव्य केलं. सोमय्यांनी देखील संजय राऊतांच्या या वक्तव्यावर टीका केली. संजय राऊत पुढील काळात अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्यासोबत जेवताना दिसतील असंही त्यांनी म्हटलं होतं.
मशिदीवरील भोंग्यांचा वाद चिघळला! राज ठाकरेंच्या नावाला काळं फासलं
सोमय्या वारंवार महाविकास आघाडीच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत होते. त्यांच्यावर एकही आरोप ‘मविआ’मधील नेत्याला करता आला नव्हता. मात्र आता संजय राऊत यांनी सोमय्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. सोमय्यांनी आयएनएस विक्रांत युद्धनौका वाचविण्याच्या मोहिमेत ७० कोटींचा भ्रष्टाचार केला असा आरोपही संजय राऊतांनी केला आहे. याआधी जेव्हाही सोमय्यांवर आरोप करण्यात आले तेव्हा ते म्हणायचे की गुन्हा दाखल करा, कोर्टात जा. मात्र महाविकास आघाडीतील एकही नेता किंवा इतर कोणीही त्यांच्या विरोधात कोर्टात गेले नव्हते. आयएनएस विक्रांत प्रकरणात मात्र काल रात्री उशिरा ट्रॉमबे पोलीस ठाण्यात सोमय्याआणि निल सोमैया यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काही लोक नखं कापूनही शहीद होण्याचा प्रयत्न करताहेत; इडीच्या कारवाईवर फडणवीसांची प्रतिक्रिया
कलम 420, 406, 34 अंतर्गत पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाऊ आमदार सुनील राऊत यांनी भोसले आणि इतर शिवसेना पदाधिकारी यांच्यासह अप्पर पोलीस आयुक्त संजय दराडे यांची भेट घेतली आणि त्यानंतर भोसले यांच्या फिर्यादीवरून किरीट सोमैयांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read also:
- राऊतांना जप्तीबद्दल आधी कल्पना द्यायला हवी होती; इडीच्या कारवाईवर जयंत पाटलांची प्रतिक्रिया
- “अचूक भविष्यवाणी करणारे गृहस्थ म्हणून सोमय्यांची महाराष्ट्रात नवी ओळख”
- संपत चाललेला पक्ष दंगलीवर उभा करू नका; वचिंतचा राज ठाकरेंवर निशाणा
- संजय बियाणीच्या मारेकऱ्यांच्या मुसक्या लवकरच आवळणार; अशोक चव्हाण
- राज ठाकरे सुरूवातीला भाजपविरोधात होते, मात्र आता बदलले; शरद पवार