मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर काल इडीने कारवाई केली. त्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. इडीने कारवाई केल्यानंतर संजय राऊतांनी भाजपचे नेते किरीट सोमय्यांवर आयएनएस विक्रांत प्रकरणी भ्रष्टाचाराचे आरोप लावले आहेत. त्याचाच धागा पकडत त्यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील निशाणा साधला आहे.
संपत चाललेला पक्ष दंगलीवर उभा करू नका; वचिंतचा राज ठाकरेंवर निशाणा
आयएनएस विक्रांत वाचविण्यासाठी जमा केलेला ५० ते ७० कोटी रुपयांचा निधी गेला कुठे ? संजय राऊतांनी किरीट सोमय्यांना केला आहे. त्यात किरीट सोमय्यांची बाजू फडणवीसांनी घेतली असल्याने संजय राऊतांनी फडणवीसांवर हल्ला चढवला आहे. आएऩएस विक्रांतच्या नावाखाली जमा केलेल्या पैशांमध्ये भ्रष्टाचार करून देशभावनेशी खेळणाऱ्या किरीट सोमय्या यांची वकिली देवेंद्र फडणवीस यांनी करू नये, असा थेट इशारा संजय राऊतांनी फडणवीसांना दिला आहे.
संजय बियाणीच्या मारेकऱ्यांच्या मुसक्या लवकरच आवळणार; अशोक चव्हाण
देवेंद्र फडणवीस हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वंयसेवक आहेत. ते सोमय्या यांच्यासारख्या देशद्रोही व्यक्तीचं समर्थन करत असताना संघाच्या दिवंगत नेत्यांच्या आत्म्याला काय वाटत असेल.? असा सवाल देखील त्यांनी यावेळी केला आहे. यावेळी ते दिल्ली येथे पत्रकारांशी बोलत होते. संजय राऊतांनी किरीट सोमय्यांवर लावलेल्या आरोपांविरोधात देवेंद्र फडणवीस मैदानात उतरले आहेत. त्यांनी किरीट सोमय्यांवरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
राज ठाकरे सुरूवातीला भाजपविरोधात होते, मात्र आता बदलले; शरद पवार
दरम्यान, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकाळात केंद्र सरकारने २०१४ साली विक्रांत युद्धनौका भंगारात विकण्यासाठी काढली होती. आयएनएस विक्रांत युद्धनौकेला वाचविण्यासाठी किरीट सोमैया यांनी एक बचाव मोहीम सुरु केली होती. यामध्ये त्यांनी युद्धनौका वाचविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी गोळा केला. हा निधी आपण राजभवनाकडे सुपूर्द करणार आणि युद्धनौका वाचवणार असं म्हटलं होतं. मात्र आरटीआय कार्यकर्त्यांनी जेव्हा माहिती अधिकारात राजभवनाकडून यासंदर्भात माहिती मागितल्यानंतर त्या माहितीअधिकारातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. राजभवनाकडे आयएनएस विक्रांत संदर्भात कोणताही निधी आलेला नाही असं सांगण्यात आलंय.
Read also:
- “दिलगिरी व्यक्त करा, अन्यथा अब्रुनुकसानीच्या दाव्याला सामोरे जा”; बंटी पाटलांचा शेलारांना संतप्त इशारा
- वसंत मोरेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चांना ऊत; रुपाली ठोंबरेंनी पाठराखण केल्याने संभ्रम
- सोमय्या पिता पुत्राविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल”; आयएनएस विक्रांत प्रकरण भोवणार
- राऊतांना जप्तीबद्दल आधी कल्पना द्यायला हवी होती; इडीच्या कारवाईवर जयंत पाटलांची प्रतिक्रिया
- “अचूक भविष्यवाणी करणारे गृहस्थ म्हणून सोमय्यांची महाराष्ट्रात नवी ओळख”