मुंबई : भाजपचे नेते किरीट सोमय्या विरुद्ध खासदार संजय राऊत असा संघर्ष महाराष्ट्रात पेटताना दिसण्यास नुकतीच सुरुवात झालीय. भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी वारंवार संजय राऊतांच्या विरोधात आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या विरोधात ईडीकडे तक्रारी केल्या होत्या. त्याचाच परिणाम म्हणून परवा संजय राऊत यांच्यावर ईडीकडून कारवाई करण्यात आलीय. ज्यामध्ये त्यांच्या ११ कोटींच्या मालमत्तेवर ईडीने टाच आणलीय. एवढंच नाही तर अलिबागमधील बीचजवळील संपत्तीवर ईडीने जप्ती आणली. यामुळे संतप्त संजय राऊतांनी भर पत्रकार परिषदेतच किरीट सोमय्यांवर अगदी खालच्या पातळीवर जाऊन शाब्दीक टीका केलीय.
“अचूक भविष्यवाणी करणारे गृहस्थ म्हणून सोमय्यांची महाराष्ट्रात नवी ओळख”
किरीट सोमय्यांनी आयएनएस विकांत युद्धनौका वाचविण्यासाठी एक बचाव मोहीम काढली आणि त्याअंतर्गत जमा झालेला निधी हा त्यांच्या मुलाच्या कंपनीत वळवला असा आरोप संजय राऊत यांनी केला. मात्र ते काहीही बोलत असतात. कोणत्याही सबळ पुराव्यांच्या अभावी ते नुसते आरोप करतात. नखं कापून कोणीही शहीद होत नाही असा टोला देखील फडणवीसांनी संजय राऊत यांना हाणला. यावर आज संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन थेट उत्तर दिलंय. काल राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी माझ्याबद्दल बोलताना म्हटलं होतं की मी काहीही आरोप करतो. नख कापून शहीद होत नाही वगैरे वगैरे…तर मला आता फडणवीसांनी सांगावं की तुम्ही तर काय $$$$? तुम्ही काय कापलं सांगा? असा संतप्त सवाल संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना विचारलाय.
संपत चाललेला पक्ष दंगलीवर उभा करू नका; वचिंतचा राज ठाकरेंवर निशाणा
देशासाठी तुमचं काय बलिदान आणि योगदान आहे? उलट ज्यांचं योगदान आहे, त्या बलिदानाचा या महाराष्ट्रात लिलाव करता ? असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केल्याने आता संघर्ष वाढणार असल्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. देवेंद्र फडणवीसांविरोधात महाविकास आघाडीचा एकही नेता भूमिका घेत नव्हता अथवा टीकाही करत नव्हता. मात्र यावेळी राऊतांनी थेट टीका केलीय. भाजपच्या नेत्यांनी कधी राम मंदिराच्या नावाने तर कधी गंगाजल विकून पैसे गोळा केलाय.
संजय बियाणीच्या मारेकऱ्यांच्या मुसक्या लवकरच आवळणार; अशोक चव्हाण
आयएनएस विक्रांत आमचा स्वाभिमान असताना तुम्ही त्याचा लिलाव केलाय. तुम्ही त्या भ्रष्ट गुन्हेगाराची बाजू घेताय असा टोलाही राऊतांनी फडणवीसांना हाणला आहे. पहिल्यांदाच राऊतांच्या आरोपांवरून किरीट सोमय्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. आता खरंच सोमय्या अडचणीत येणार की यावेळी देखील राऊतांचा वार फुसका निघणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
Read also:
- देशद्रोही किरीट सोमय्यांची वकिली फडणवीसांनी करू नये; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
- “दिलगिरी व्यक्त करा, अन्यथा अब्रुनुकसानीच्या दाव्याला सामोरे जा”; बंटी पाटलांचा शेलारांना संतप्त इशारा
- वसंत मोरेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चांना ऊत; रुपाली ठोंबरेंनी पाठराखण केल्याने संभ्रम
- सोमय्या पिता पुत्राविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल”; आयएनएस विक्रांत प्रकरण भोवणार
- राऊतांना जप्तीबद्दल आधी कल्पना द्यायला हवी होती; इडीच्या कारवाईवर जयंत पाटलांची प्रतिक्रिया