मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी केलेलं भाषण राज्यात चांगलाचं गाजलं आहे. त्याचा परिणाम म्हणून पुण्यात मुस्लिम शाखा अध्यक्षांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली आहे. त्याचबरोबर पुणे शहराध्यक्ष वसंत मोरेंनी राज ठाकरे यांच्याविरोधात बंड केल्याने त्यांना आता शहारध्यक्ष पदावरून हटवलं आहे. त्यांच्या जागी आता साईनाथ संभाजी बाबर यांची मनसे पुणे शहाराध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार रोहित पवारांनी त्यांना सल्ला दिला आहे.
रोहित पवार म्हणाले की, भाजप जवळ गेलेल्या नेत्याला आणि पक्षाला भाजप संपूर्ण संपवतात. हा त्यांचा इतिहास आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी जपून पावले टाकावीत. शब्द मोजून आणि जपून वापरले पाहिजे. सातत्याने शिवराळ भाषा वापरणाच्या मागच्या शिवसेना संजय राऊत यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत असंही त्यांनी म्हटलं आहे.
वसंत मोरेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चांना ऊत; रुपाली ठोंबरेंनी पाठराखण केल्याने संभ्रम
महाराष्ट्रात भाजपला आणण्यात शिवसेनाच जबाबदार आहे. पक्षवाढीच्या नावाखाली भाजपने शिवसेनेला पुन्हा संपवण्याचा प्रकार सुरू केला आहे. आता मनसे चे अध्यक्ष राज ठाकरे हे भाजपशी सलगी वाढवत असल्यानं त्यांनी शिवसेनेच्या इतिहासाचा अभ्यास करावा असा सल्ला देखील रोहित पवारांनी राज ठाकरे यांना दिला आहे. त्यावेळी ते कर्जत येथील वारकऱ्यांच्या निवासस्थानी उभारण्यात आलेल्या भक्तनिवास भूमिपुजनाच्या कार्यक्रमप्रसंगी बोलत होते.
सोमय्या पिता पुत्राविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल”; आयएनएस विक्रांत प्रकरण भोवणार
दरम्यान, मशिदीवरील भोंगे खाली उतरावा अऩ्यथा त्याच्या दुप्पड आवाजात हनुमान चालिसा लावण्यात येईल. असा राज ठाकरे यांनी इशारा दिला होता. त्यानंतर राज्यात काही ठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी मंदिरांवर हनुमान चालिसा लावली होती. तर पुण्यात देखील मनसे राज्य सरचिटणीस हेमंत संभूस यांनी भोंगे खाली उतरवण्याचा इशारा दिला. मात्र पुणे शहराध्यक्ष वसंत मोरेंनी यांनी राज ठाकरे यांचा आदेश धुडगावून लावत. प्रभागात शांतता ठेवण्याचं आव्हान केलं होतं. त्यानंतर आज त्यांची शहराध्यक्ष पदांवरून हाकलपट्टी करण्यात आली.
Read also:
- वसंत मोरेंची अखेर शहराध्यक्ष पदांवरून हाकालपट्टी! साईनाथ बाबर नवे शहराध्यक्ष
- शेतकऱ्यांना घेऊन किरीट सोमय्या इडीच्या दरबारी! नवी राजकीय खेळी करण्याच्या तयारीत
- तुमच्याच पक्षाचे नेते मलिकांपेक्षा संजय राऊत जास्त महत्वाचे का? इम्तियाज जलीलांचा सवाल
- तुम्ही तर काय $$$? काय कापलं सांगा? राऊतांची फडणवीसांवर टीका करताना जीभ घसरली
- देशद्रोही किरीट सोमय्यांची वकिली फडणवीसांनी करू नये; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा