मुंबई : आयएनएस विक्रांत युद्धनौका वाचवण्यासाठी जमावलेल्या पैशांमध्ये भाजपनेते किरीट सोमय्यांनी भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला. त्यामुळे किरीट सोमय्या पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यातच आज जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना संबंधी आज किरीट सोमय्या शेतकऱ्यांसह इडीच्या कार्यालयात दाखल झाले आहे. त्यामुळे यामधून कोणती माहिती समोर येणार आहे ते आता पहाणं महत्वाचं ठरणार आहे.
सोमय्या पिता पुत्राविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल”; आयएनएस विक्रांत प्रकरण भोवणार
भाजप नेते किरीट सोमय्यांनी कालच त्यांच्या फेसबुक अकांऊटवर यासंदर्भात पोस्ट शेअर केली होती. त्यात त्यांनी असं म्हटलं होतं की, 7 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याचे शेतकरी, सदस्य, संचालक जरंडेश्वर साखर कारखान्याच्या मागणीसाठी कैसर-ए-हिंद बिल्डिंग, बॅलार्ड इस्टेट फोर्ट, मुंबई येथे इडीच्या अधिकाऱ्यांना भेटणार आहे. त्याचसोबत त्यांनी जरंडेश्वर साखर कारखान्याचा ताबा 27000 शेतकऱ्यांना देण्याची मागणी देखील केली आहे.
राऊतांना जप्तीबद्दल आधी कल्पना द्यायला हवी होती; इडीच्या कारवाईवर जयंत पाटलांची प्रतिक्रिया
किरीट सोमय्या यांनी काल म्हटल्या प्रमाणे त्यांनी आज थेट इडीचं कार्यलय गाठलं. त्याठिकाणी कोणती चर्चा झाली आहे. ती माहिती अजून समोर आली नाही. परंतु किरीट सोमय्यांनी या प्रकरणावरून पुन्हा एकदा माध्यमाचं लक्ष आपल्याकडे लागून ठेवलं. त्यामुळे आगामी काही काळात राज्यात कोणत्या राजकीय घडामोडी घडणार त्याची उत्सुकता लागून राहिली आहे.
“अचूक भविष्यवाणी करणारे गृहस्थ म्हणून सोमय्यांची महाराष्ट्रात नवी ओळख”
दरम्यान, काल शिवसेना संजय राऊतांनी किरीट सोमय्यांवर आयएनएस विक्रांत संबंधी भ्रष्टाचाराचे आरोप लावले आहेत. या प्रकरणी किरीट सोमय्या आणि त्यांचा पुत्र नील सोमय्या यांच्याविरोधात आज फसवणुकीचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणावरून नाशिक, औरंगाबादसह इतर ठिकाणी सोमय्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी किरीट सोमय्यांना अटक करण्याची मागणी केली आहे.
Read also:
- तुमच्याच पक्षाचे नेते मलिकांपेक्षा संजय राऊत जास्त महत्वाचे का? इम्तियाज जलीलांचा सवाल
- तुम्ही तर काय $$$? काय कापलं सांगा? राऊतांची फडणवीसांवर टीका करताना जीभ घसरली
- देशद्रोही किरीट सोमय्यांची वकिली फडणवीसांनी करू नये; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
- “दिलगिरी व्यक्त करा, अन्यथा अब्रुनुकसानीच्या दाव्याला सामोरे जा”; बंटी पाटलांचा शेलारांना संतप्त इशारा
- वसंत मोरेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चांना ऊत; रुपाली ठोंबरेंनी पाठराखण केल्याने संभ्रम