पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसेचे नेते अजित पवार यांच्या उपस्थित आज प्रसिद्ध अभिनेत्री आसावरी जोशी आणि अभिनेत्री स्वागता शाह यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. चित्रपट , साहित्य कला आणि सांस्कृतिक विभाग सेलचे राज्यप्रमुख बाबासाहेब पाटिल यांच्या पुढाकाराने हा पक्ष प्रवेश झाला आहे. यावेळी यावेळी पक्षाचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश प्रवक्ते महेश तपासे, प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील, अल्पसंख्याक सेल प्रदेश उपाध्यक्ष वसीम बुऱ्हाण, मावळ तालुकाध्यक्ष गणेश खांडगे उपस्थित होते.
शेतकऱ्यांना घेऊन किरीट सोमय्या इडीच्या दरबारी! नवी राजकीय खेळी करण्याच्या तयारीत
राज्यात कोरोनाचे सावट असल्यामुळे अनेक गर्दीच्या कार्यक्रमांवर निर्बंध लावण्यात आले होते. कोरोना नियंत्रणात आल्यानंतर आता राज्यात नियमांमध्ये मोठी शिथिलता देण्यात आली आहे. तरीही सर्वांनी आपली काळजी घ्यावी, असे आवाहन यावेळी अजितदादांनी केले. शरद पवार यांनी आपल्या राजकीय जीवनात कला क्षेत्राला भरभरून मदत केली आहे. कला क्षेत्रासाठी तसेच काम करण्याची पक्षाची भूमिका आहे. राज्यातील कला क्षेत्रातील समस्या नक्कीच मार्गी लावल्या जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तुमच्याच पक्षाचे नेते मलिकांपेक्षा संजय राऊत जास्त महत्वाचे का? इम्तियाज जलीलांचा सवाल
यावेळी मावळ विधानसभेचे लोकप्रिय आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकाराने भाजपमधील अनेक मान्यवरांनी पक्षात प्रवेश केला. यावर अजितदादा म्हणाले की, मागील ३० वर्षे राजकीय क्षेत्रात काम करत असताना मावळ मतदारसंघात पक्षाला विजय मिळवता आला नाही. मात्र सुनील शेळके यांच्यामुळे पक्षाला या जागेवर प्रचंड मतांनी विजय मिळवता आला. जनतेने आपल्याला मत देऊन त्यांची जबाबदारी पूर्ण केली. आता आपल्याला विकास कामे करून आपली जबाबदारी पार पाडायची आहे. सर्वांनी मिळून तालुक्याचा विकास करण्याचा प्रयत्न करूया, असे आवाहन अजितदादांनी यावेळी केले. तसेच अजितदादांनी पक्ष प्रवेशासाठी प्रयत्न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले व मान्यवरांचे पक्षात स्वागत केले.
तुम्ही तर काय $$$? काय कापलं सांगा? राऊतांची फडणवीसांवर टीका करताना जीभ घसरली
मावळ तालुक्यातील अमोल केदारी, संस्थापक, बाळासाहेब आडकर, दिनकर आडक, अरूण आडकर , तसेच काँग्रेस पक्षाचे मावळ तालुका प्रवक्ते फिरोज शेख यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा हाती घेतला. नवी मुंबईचे अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष सुलतान मालदार यांच्या पुढाकाराने नंदू भोपी, जिल्हाध्यक्ष, रायगड, सरपंच, भारत चौधरी, कामगार नेता, तळोजा, भानुदास म्हात्रे, उपसरपंच, नितळम तसेच इतर मान्यवरांनीही यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
Read also:
- बकरी, वाघाच्या लढाईत बकरीला वाचवणं गरजेचं! एसटी कर्मचाऱ्यांना आता २२ एप्रिलची दिली तारीख
- वसंत भाऊ तुमची हत्या केली की, आत्महत्या हे सर्व महाराष्ट्र पाहत आहे; रूपाली पाटलांची प्रतिक्रिया
- खरा मावळा! गेल्या 27 वर्षापासून साहेबांसोबत आहे आणि पुढेही राहणार; वसंत मोरे
- भाजपच्या जवळ जो व्यक्ती, पक्ष गेला, तो संपला! रोहित पवारांचा राज ठाकरेंना सल्ला
- वसंत मोरेंची अखेर शहराध्यक्ष पदांवरून हाकालपट्टी! साईनाथ बाबर नवे शहराध्यक्ष