मुंबई : गेल्या काही दिवसात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची अलिबागजवळी जमीन आणि दादर येथील फ्लॅट इडीने जप्त केला. त्यामुळे संजय राऊत आणि शिवसैनिकांनी इडी आणि भाजपच्या विरोधात जोरदार निर्दशने केलीत. अशातच आता शिवसेनेचच मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांना आयकर विभागाने पुन्हा एकदा झटका दिला आहे. त्यांची जवळपास 40 मालमत्ता आयकर विभागाने जप्त केली आहेत.
कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? नारायण राणेंचा संजय राऊतांवर घणाघात
यशवंत जाधव यांची आयकर विभागाने 40 मालमत्तांवर कारवाई करत ते जप्त केली आहेत. त्याचबरोबर त्यांचा वांद्रे भागातील पाच कोटी रूपयांचा प्लॅटही देखील जप्त करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्याचबरोबर भायखळ्यात 26 फ्लॅट्सवरही जप्तहीची कारवाई झाली असल्याचं समजत आहे. यशवंत जाधव यांच्या मालकीच्या काही मालमत्ता नातेवाईकांच्या माध्यमातून चालवल्या जात होत्या.
“ते आम्हाला ठार मारतील, त्याची तयारी आहे, मात्र पुढील 25 वर्ष भाजप सत्तेत येणार नाही”
यशंवत जाधव यांचे पुतणे विनित जाधव आणि मोहिते नावाच्या नातेवाईकालाही आयकर विभागाकडून समन्स पाठवण्यात आले आहेत. त्याअगोदर यशंवत जाधव यांच्याकडे सापडलेल्या डायरीत मातोश्री ला दोन कोटी आणि 50 लाख रूपये किमतीचे घड्याळ दिल्याचा उल्लेख होता. तर त्यानंतर केबलमॅन आणि एम ताई अशा दोन व्यक्तींसोबत एक कोटी 75 लाख रूपयांचे व्यवहार झाल्याचंही समोर आलं होतं.
अभिनेत्री आसावरी जोशी यांचा राष्ट्रवादीत प्रवेश; अजित पवार यांची उपस्थिती
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय तपास यंत्रणा राज्यात चांगल्याच सक्रिय झाल्याचं दिसत आहे. अलिकडेच इडीने शिवसेना खासदार संजय राऊतांवर कारवाई करण्यात आली. त्यानंतर यशंवत जाधव यांची 40 मालमत्तावर आयकर विभागाने जप्तीची कारवाई केली. आगामी महापालिका डोळ्यासमोर ठेऊन कारवाई करत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात येत आहेत. त्यामुळे याचा परिणाम या निवडणुकांमध्ये दिसून येणार की नाही. ते आता पहाणं महत्वाचं ठरणार आहे.
Read also:
- कोल्हापुरची निवडणुक सोपी समजून घोडचूक करू नका; चंद्रकांत पाटलांचा ‘मविआ’ इशारा
- संजय राऊत यांचं लक्ष पक्षप्रमुख पदावर की मुख्यमंत्री पदावर? भाजप नेत्याचा राऊतांना सवाल
- वसंत मोरे, साईनाथ बाबर यांची चाय पे चर्चा! शहराध्यपदी निवड झाल्यानं केलं अभिनंदन
- “दादा..! जिथे कुठे असाल तिथून परत या ;” चंद्रकांत पाटलांच्या आठवणीत कोथरुडकरांची बॅनरबाजी
- “दादा..! जिथे कुठे असाल तिथून परत या ;” चंद्रकांत पाटलांच्या आठवणीत कोथरुडकरांची बॅनरबाजी