कोल्हापूर : कोल्हापूर उत्तरेची पोटनिवडणूक आता अंतिम टप्प्यात आली आहे. भाजप विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात कोल्हापूर उत्तरेच्या जागेवरून जोरदार संघर्ष बघायला मिळाला आहे.आता कोल्हापूरच्या या सत्ता संघर्षात एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी दोन्ही बाजूंचे नेते सोडत नसल्याची प्रचिती कोल्हापूरकरांना आली असणार हे मात्र नक्की.
“ते आम्हाला ठार मारतील, त्याची तयारी आहे, मात्र पुढील 25 वर्ष भाजप सत्तेत येणार नाही”
प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात भाजपकडून मुंबई, पुणे येथील कार्यकर्ते कोल्हापूरच्या राजकीय आखाड्यात उतरविण्यात आले आहेत. आमदार आशिष शेलार, भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे शेवटच्या टप्प्यात कोल्हापूर उत्तरेत अत्यंत आक्रमकतेने प्रचार करत आहेत.
अभिनेत्री आसावरी जोशी यांचा राष्ट्रवादीत प्रवेश; अजित पवार यांची उपस्थिती
महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका करताना आज चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे की तीन पक्ष जरी एकत्रित असले तरी कोल्हापूरच्या या राजकीय मैदानाला तुम्ही सोपी समजण्याची घोडचूक अजिबात करू नका. महाविकास आघाडी सरकारकडून करण्यात आलेली दादागिरी आणि मतदारांवर टाकलेला दबाव आम्ही अजिबात सहन करणार नाही असा इशाराही चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. राजारामपुरी, दसरे गल्ली, कदमवाडी, बुधवारपेठ तालीम याठिकाणी भाजपकडून महिलांसाठी मेळावे घेण्यात आले ज्यांचे प्रतिनिधित्व चित्रा वाघ यांनी केले. सभेवर झालेल्या दगडफेकीवरून पुन्हा एकदा चित्रा वाघ यांनी गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई आणि पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्यावर हल्ला चढवला आहे.
बकरी, वाघाच्या लढाईत बकरीला वाचवणं गरजेचं! एसटी कर्मचाऱ्यांना आता २२ एप्रिलची दिली तारीख
गृहराज्यमंत्री हे सध्या विरोधीपक्षांच्या रांगोळ्या पुसण्यात दंग आहे. त्यांच्या सभांमध्ये दगडफेक करण्यातं त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील खोट्यानाट्या वावड्या उठवण्यात ते पुढाकार दाखवत आहे. बाकी कायदासुव्यवस्थेच्या नावावर तर सगळीकडंच बोंबचं आहे असा टोलाही वाघ यांनी मारला आहे.
Read also:
- संजय राऊत यांचं लक्ष पक्षप्रमुख पदावर की मुख्यमंत्री पदावर? भाजप नेत्याचा राऊतांना सवाल
- वसंत मोरे, साईनाथ बाबर यांची चाय पे चर्चा! शहराध्यपदी निवड झाल्यानं केलं अभिनंदन
- “दादा..! जिथे कुठे असाल तिथून परत या ;” चंद्रकांत पाटलांच्या आठवणीत कोथरुडकरांची बॅनरबाजी
- “दादा..! जिथे कुठे असाल तिथून परत या ;” चंद्रकांत पाटलांच्या आठवणीत कोथरुडकरांची बॅनरबाजी
- कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? नारायण राणेंचा संजय राऊतांवर घणाघात