मुंबई : गुढीपाडव्याच्या दिवशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे खाली उतरावा, अन्यथा हनुमान चालिसा लावण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता. राज ठाकरे यांच्या आव्हांना प्रतिसाद देत राज्यात काही ठिकाणी मंदिरांवर हनुमान चालिसा लावण्यात आली. तर पुण्यात या संदर्भात पुणे शहराध्यक्ष वसंत मोरेंनी बंडाची भूमिका आपल्याला प्रभागात शांतता ठेवावी असं सांगितलं होतं. त्याचाच परिणाम म्हणून मनसेतून वसंत मोरे यांना शहराध्यक्ष पदावरून हटवण्यात आलं आहे. त्यांनतर त्यांना राज्यातील विविध पक्षांच्या ऑफर आल्या असल्याचं त्यांनी सांगितलं.
“दादा..! जिथे कुठे असाल तिथून परत या ;” चंद्रकांत पाटलांच्या आठवणीत कोथरुडकरांची बॅनरबाजी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील वसंत मोरे यांना फोन करून पक्षात येण्याचं आव्हान केलं होतं. पंरतु त्यांनी मनसे न सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावेळी ते म्हणाले की, माझं थेट त्यांच्याशी बोलणं झाल नाही, परंतु त्यांनी भेटायला बोलवलं आहे. रात्री मी साहेबांना मेसेज केला आहे. परंतु अजूनही त्यांचा मला रिप्लाय आलेला नाही. मी साहेबांचा कट्टर कार्यकर्ता आहे. माझ्याकडे सगळ्या पक्षांच्या ऑफर आहेत. काल पुणे राष्ट्रावादी काॅंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी देखील वसंत मोरेंना राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये येण्याचं आव्हान केलं होतं.
कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? नारायण राणेंचा संजय राऊतांवर घणाघात
वसंत मोरे बोलताना म्हणाले की, मनसे आणि राज ठाकरे साहेब माझ्या मनात कायम आहे. मनसे सोडण्याचा विचार अजून माझ्या मनात आलेला नाही आहे. ज्यावेळी मनात विचार आला त्यावेळी मी सर्वांसमोर सांगेन. तसेच गेल्या काही दिवसापासून माझं अनेक नेत्यांशी संपर्क होत आहे. माझं वय 47 आहे आणि गेल्या 27 वयापासून मी राज ठाकरे यांच्यासोबत आहे आणि पुढेही राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच अझरूद्दीन सय्यद यांनी देखील मनसेतून शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.
“ते आम्हाला ठार मारतील, त्याची तयारी आहे, मात्र पुढील 25 वर्ष भाजप सत्तेत येणार नाही”
वसंत मोरे यांच्या जागी आता साईनाथ बाबर यांची मनसे पुणे शहर अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. राज ठाकरेंवर नाराजी व्यक्त करत पुण्यात मुस्लिम कार्यकर्त्यांनी देखील राजीनामे दिले आहेत. त्यामुळे वसंत मोरे यांच्या हाकालपट्टीमुळे आता मनसेला गळती लागली आहे. तसेच सकाळी वसंत मोरे हे मनसेच्या व्हॉट्सअप ग्रुपमधून देखील लेप्ट झाले होते. त्यामुळे वसंत मोरे आता काय भूमिका घेणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Read also:
- यशंवत जाधवांना आयकर विभागाचा झटका ! 40 मालमत्तांवरसह 26 फ्लॅट्सवरही जप्तीची कारवाई
- कोल्हापुरची निवडणुक सोपी समजून घोडचूक करू नका; चंद्रकांत पाटलांचा ‘मविआ’ इशारा
- संजय राऊत यांचं लक्ष पक्षप्रमुख पदावर की मुख्यमंत्री पदावर? भाजप नेत्याचा राऊतांना सवाल
- वसंत मोरे, साईनाथ बाबर यांची चाय पे चर्चा! शहराध्यपदी निवड झाल्यानं केलं अभिनंदन
- “दादा..! जिथे कुठे असाल तिथून परत या ;” चंद्रकांत पाटलांच्या आठवणीत कोथरुडकरांची बॅनरबाजी